WhatsApp ; ‘या’ सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप म्हणून WhatsApp प्रसिद्ध आहे. WhatsAppने नवी घोषणा केली असून यामध्ये आपल्या बिजनेस चॅट सर्व्हिससाठी ( Business chat service) कंपन्यांवर चार्ज लावण्यास सुरुवात करणार असल्याचं, गुरूवारी सांगितलं आहे. WhatsAppबिजनेसचे पाच कोटीहून अधिक यूजर्स ( Users) आहेत. या बिझनेस चॅट सर्व्हिससाठी किती चार्ज लागणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एक नवं फीचर WhatsApp Business अकाउंट अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा ही नवीन घोषणा केली आहे.

ब्लॉग पोस्टमध्ये काय म्हटलंय ?

या ब्लॉगमध्ये व्हॉट्सअपने पाच कोटीहून अधिक बिजनेस युजर्ससाठी, पे-टू मेसेज ऑप्शनची घोषणा केली आहे.याविषयी माहिती देताना कंपनीने ‘आम्ही बिजनेस ग्राहकांसाठी चालू असलेल्या काही सेवांवर शुल्क आकारणार आहोत, जेणेकरून आपल्या इतर दोन अब्जाहून अधिक ग्राहकांना मोफत एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड टेक्स्ट, व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंगसारख्या सुविधा उपलब्ध करू शकू. त्यामुळे आता यापुढे whtsapp चे बिझनेस अकाउंट वापरायचे असल्यास तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायामध्ये मदत –

whatsapp न काही दिवसांपूर्वी या अपच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही सुवीधा सुरु केली होती. यामध्ये चॅटद्वारे लोक बिजनेस करू शकतील. त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर लवकरच डायरेक्ट शॉपिंग करण्याचं नवं फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने छोट्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी मदत मिळणार असल्याचं, व्हॉट्सअपने सांगितलं आहे.त्याचबरोबर कंपनीने यासाठी माहिती देण्यास देखील सुरुवात केली आहे.

डेटा फेसबुकवर ( Facebook) शेअर केला जाणार –

बिजनेस आणि ग्राहक दोघांना जागरूक करण्यासाठी, एखाद्या स्पेशल केसमध्ये त्यांचा डेटा फेसबुकवर शेअर केला जाईल. त्याशिवाय, फेसबुक होस्टिंग करण्यासाठी अधिकचे पैसे देखील मोजावे लागणार आहेत. याचबरोबर whatsapp वरून व्यवसाय करणाऱ्यांसाठी फेसबुक होस्टिंग सर्व्हिस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजे बिजनेस ग्राहकांमधील मेसेज कोणीही दुसरा व्यक्ती पाहू शकणार नाही. त्याचबरोबर या व्यवसायासंदर्भात पूर्णपणे सुरक्षा पाळण्यात येणार असून कुणीही तुमच्या व्यवसायासंबंधी माहिती पाहू शकणार नाहीत.