कामाची गोष्ट ! ‘छोटे’ व्यवसायिक करु शकतात ‘Whatsapp’ वर व्यापार, असा चालतो व्यवसाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आतापर्यंत लोकांना व्हॉट्सअ‍ॅपचा फक्त एकच उपयोग माहित असेल. एखाद्याशी चॅटिंग करणे. याशिवाय व्हॉट्स अ‍ॅपचा छोटे व्यवसायिक आपल्या उद्योगाच्या भरभरासाठी देखील वापर करतात. जर तुम्ही एखाद्या व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर व्हॉट्स अ‍ॅप तुमची मदत करेल. अनेक छोटे व्यवसायिक मोठे उत्पन्न कमावत आहेत.

असेच एक व्यवासायिक आहेत ज्याचे नाव आहे पार्थ कुंडू, जे फिश हॅप्पीचे संस्थापक आहेत. जे चँटच्या माध्यमातून काही निवडक मासे विक्रेत्यांकडून फिश खरेदी करुन थेट घरापर्यंत डिलीवरी देतात आणि हाच त्यांच्या व्यवसायाचा यूएसपी आहे.  
 
असे होतो व्हॉट्स अ‍ॅपवरुन व्यवसाय –
कुंडू यांनी 2019 साली व्हॉट्स अ‍ॅप बिजनेसचा वापर सुरु केला. ते म्हणाले की, अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवसाय सुरु केल्याने खूप फायदा झाला. या प्रमुख कारणाने व्हॉट्स अ‍ॅप युजरला महिती आहे. आता कुंडू 97 टक्के व्यवसाय व्हॉट्सअ‍ॅपवरुन होतो. ते दिल्लीतील काही निवडक व्यापाऱ्यांकडून मासे खरेदी करतात. कुंडू यांना महिन्याला 500 ग्राहक हमखास मिळतात. छोटया व्यवसायिकांसाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. 
 
भारतातील 10 लाख व्यवसायिक बिजनेस व्हॉट्स अ‍ॅपवर रजिस्टर –
व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे हेड अभिजित बोस यांनी सांगितले की, अ‍ॅपच्या मदतीने व्यवसाय करणाऱ्यांना सर्वात अधिक फायदा हा होतो की ग्राहक आणि सेवा देणारे यांच्यात थेट संवाद होतो. भारतात आता प्रयत्न 10 लाख व्यवसायिक व्हॉट्सअ‍ॅपवर रजिस्टर आहेत.