WhatsApp Call Record | व्हॉट्सअ‍ॅप काॅल कसा Record करायचा?; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Call Record | सामान्य काॅलपेक्षा आता व्हॉट्सअ‍ॅप काॅल WhatsApp Call देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. विशेष म्हणजे WhatsApp Call वर एकदम स्पष्ट आवाज येतो. त्याचबरोबर , मोबाइलमध्ये नेटवर्क नसल्यास तुम्ही वाय-फायशी कनेक्ट करूनही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता. व्हिडिओ कॉल आणि वॉइस कॉलही करू शकता. मात्र, नियमित कॉलप्रमाणे WhatsApp Call रेकॉर्ड करणे अवघड आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगसाठी कोणतेही फीचर दिले जात नाही. मात्र, तुम्ही सोप्या ट्रिकच्या मदतीने WhatsApp वॉइस कॉलला रेकॉर्ड (WhatsApp Call Record) करू शकणार आहात. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

हे अ‍ॅप डाउनलोड करा –
समजा अँड्राइड फोनच्या (Android Phone) माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप वॉइस कॉल रेकॉर्ड करणे खूपच सोपे आहे. यासाठी तुम्हाला Google Play Store वरून Call Recorder: Cube ACR अ‍ॅपला फोनमध्ये इंस्टॉल करावे लागणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सहज व्हॉट्सअ‍ॅप वॉइस कॉल रेकॉर्ड करू शकता. मात्र, लक्षात घ्या की रेकॉर्डिंग फीचर सर्वच अँड्राइड फोनमध्ये काम करत नाहीये.

काय आहे प्रक्रिया –

– प्रथम Google Play Store वर जा येथे Call Recorder: Cube ACR ला सर्च करा व या अ‍ॅपला फोनमध्ये इंस्टॉल करा.

– त्यानंतर अ‍ॅप ओपन करून, बॅकग्राउंडमध्ये रन करण्याची परमिशन द्या.

– आता WhatsApp ला तुमच्या फोनमध्ये ओपन करा व कोणत्याही कॉन्टॅक्टला वॉइस कॉल करा.

– आता Cube ACR आपोआप तुमच्या WhatsApp Call Record करण्यास सुरुवात करेल.

– जर तुमचा WhatsApp Call रेकॉर्ड होत नसल्यास पुन्हा Cube ACR अ‍ॅपला ओपन करून Force VoiP Call as a Voice Call पर्याय निवडा.

– आता पुन्हा WhatsApp Call करा. अशाप्रकारे, कॉल रेकॉर्ड होण्यास सुरुवात होईल.

 

Web Title :- WhatsApp Call Record | how to record whatsapp call in android smartphone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

 

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर