सर्वात पहिल्यांदा मेसेज कोणी केला हे ‘ट्रेस’ करणार ‘Whatsapp’, IIT च्या प्राध्यापकानं सांगितली ‘ही’ युक्ती,जाणून घ्या

वी दिल्ली : वृत्तसंस्था – आता व्हॉट्सअ‍ॅपवर चूकीची माहिती शेअर करणाऱ्या किंवा फेक मेसेज व्हायरल करणाऱ्या लोकांना चांगलाच आळा बसणार आहे. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप व्हायरल होणाऱ्या मेसेजचा स्त्रोत ट्रॅक करु शकणार आहेत. यासाठी आता पहिल्यांदा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील मेसेजच्या कंटेंटमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

आयआयटी मद्रासच्या प्रोफेसरने मद्रास उच्च न्यायालयात या संबंधित एक अहवाल दाखल केला होता. त्यांनी या अहवालात यूजर्सची माहिती देणारी माहिती सहभागी करण्याची पद्धत सुचवली आहे. यूजरच्या माहितीला ओपन फाॅर्मेटमध्ये जोडण्यात येईल आणि ही माहिती एनक्रिप्ट करण्यात येईल.

अशी होणार ट्रॅकिंग
पहिल्या पर्यायात यात व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवणाऱ्या पहिल्या यूजरची माहिती देण्यात येईल. ज्याला मेसेज वाचणारा प्रत्येक माणूस वाचू शकेल. दुसऱ्या पर्यायात व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेज बनवणाऱ्याची माहिती आणि तो पहिल्यांदा फॉरवर्ड करणाऱ्याची माहिती देण्यात येईल. या माहितीला एजन्सीकडून पाठवण्यात येईल. ज्यात ईमेज, ऑ़डिओ व व्हिडिओ यात देखील टेक्स्टला जोडण्यात येईल, तर या मेसेजला यूजरच्या मेसेजचा स्रोत समजण्यात येईल.

या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की यूजरची माहिती मेसेजमध्ये सहभागी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला जुने आर्किटेक्चर बदलावे लागेल. एवढेच नाही तर अशाने यूजर्सच्या प्रायवसीचा भंग होईल. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारकडून दबाव येत आहे की ते आपल्या प्लॅटफार्मवरुन कंटेंट ट्रेस करण्याची सुविधा द्यावी.

आरोग्यविषयक वृत्त