WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारताचे स्वत:चे Sandes अ‍ॅप, जाणून घ्या कसे करते काम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इन्स्टंट मेसेज अ‍ॅप WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी पर्याय संदेस (Sandes) नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. मात्र, अजूनपर्यंत याचा वापर केवळ सरकारी कर्मचारी आणि त्या एजन्सींमध्ये अंतर्गत प्रकारे केला जात आहे, ज्या सरकारशी संबंधीत आहेत. व्हॉट्सअपप्रमाणे (WhatsApp) नवीन एनआयसी प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्याही व्यक्तीचा मोबाइल नंबर किंवा ईमेलसोबत सर्व प्रकारच्या कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो. संदेस का बनवण्यात आले आहे आणि ते कसे काम करते.

हे स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप विकसित करण्याचा विचार मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच आला होता. मात्र यावर प्रत्यक्ष काम 2020 च्या प्रारंभी सुरू झाले. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी पसरली आणि देशव्यापी लॉकडाऊन लावला गेला तेव्हा सरकारने ही प्रक्रिया वेगाने ट्रॅक केली, कारण घरातून काम करताना संवेदनशील धोरणात्मक प्रकरणावर संवाद करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांमध्ये सुसंवादाची आवश्यक जाणवत होती. एनआयसीने आपले व्हर्जन ऑगस्ट 2020 मध्ये जारी केले.

अधिकृत चर्चा सुरक्षित करण्यासाठी हाय लेव्हल चर्चेनंतर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी)
गव्हर्मेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम (जीआयएमएस) वर काम करणे सुरू केले, जो एक ओपन सोर्स,
क्लाउड इनेबल्ड, एंड टू एंड एनक्रिप्टेड ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, जो भारत सरकारच्या डेटा
सेंटरवर होस्ट केला आहे. संदेस सरकार आणि नागरिकांमध्ये ताबडतोब आणि सुरक्षित मेसेज
पाठवण्यासाठी एनआयसीकडून विकसित करण्यात आलेला स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे.

इतर अ‍ॅपप्रमाणे यात प्रथम यूजरला रजिस्ट्रेशनसाठी एक वैध मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी द्यावा लागेल. Sandes च्या अँड्रॉइड आणि iOS व्हर्जन https://gims.gov.in वर उपलब्ध आहे. संदेसमध्ये ईमेल आणि मोबाइल आधारित सेल्फ रजिस्ट्रेशन, वन-टू-वन आणि ग्रुप मेसेजिंग, फाईल आणि मीडिया शेयरिंग, ऑडियो व्हिडिओ कॉलसह चॅटबोट सक्षम डॅशबोर्ड आहे.

हे देखील वाचा

Rajesh Tope | राज्यातील ‘हे’ 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यातील निर्बंध उठणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  whatsapp | central government developed sandes app to compete whatsapp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update