WhatsApp वर सुरू आहे ‘खतरनाक स्कॅम’, कधीही करू नका ‘ही’ चूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp यूजर्सना हॅकर्स सतत टार्गेट करत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे WhatsApp ची लोकप्रियता. घोटाळेबाज अनेक मार्गांनी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा यूजर्स त्यांना बळी पडतात. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

 

स्कॅमर बँकिंग किंवा सरकारी विभागांकडून संदेश पाठवल्याचा दावा करून यूजर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये टार्गेटला त्यांच्या बोलण्यात अडकवून पैसे चोरणे आणि व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची वैयक्तिक माहिती मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे.

 

आसामच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना याबाबत इशारा दिला आहे. आसाम सीआयडीने याबाबत सार्वजनिक सूचना जारी केली आहे. सायबर गुन्हेगार नामांकित अधिकार्‍यांचा प्रोफाईल फोटो आणि नावाचा वापर करत आहेत. (WhatsApp)

 

कशी करतात फसवणूक ?

सायबर गुन्हेगार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा अनअथॉराईज्ड अ‍ॅक्सेस मिळवतात. यानंतर, ते विशिष्ट संस्थेची सर्व माहिती आणि कर्मचार्‍यांची माहिती अधिकृत वेबसाइटवरून गोळा करतात.

यानंतर, ते वरिष्ठ अधिकारी किंवा नेत्याच्या नावाची माहिती वेबसाइट, सोशल मीडिया, ईमेल किंवा मेसेंजरवरून मिळवू शकतात.
यानंतर घोटाळेबाज लोकांना त्यांच्या नावाने मेसेज करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

अशा मेसेज किंवा ईमेलला बळी पडू नये, असे युजर्सना सांगण्यात आले आहे.
तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर खरेदीसाठी पेमेंट करण्यापूर्वी किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संबंधित अधिकार्‍याकडे त्याची पडताळणी करा.
अशा क्रमांकाबाबत सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवरही तक्रार करा.

 

Web Title : – WhatsApp | cid warns against dangerous whatsapp scam

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा