मोबाईलच्या बॅटरीची होणार ‘बचत’, WhatsApp आणणार नवीन ‘फीचर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज पूर्ण जगभरात सोशल मीडियाचा बोलबाला आहे. त्यातच व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वाना माहितीच आहे की, व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी दरवेळी नवीन फीचर्स आणत असते. आताही डार्क मोड नावाचे फिचर ग्राहकांसाठी व्हाट्सअ‍ॅप घेऊन येणार आहे. या डार्क मोडची सध्या अ‍ॅड्रॉइड अ‍ॅड आयओएस मध्ये चाचणी सुरु आहे. हा डार्क मोड व्हाट्सअ‍ॅप वेब आणि व्हाट्सअ‍ॅप डेकस्टॉप साठी येणार आहे. या डार्क मोडमुळे मोबाईलच्या बॅटरीची बचत होणार असून हे ग्राहकांच्या फायद्याचे आहे.

WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, याआधी डार्क मोड व्हाट्सअ‍ॅप वेब आणि डेकस्टॉप ला सपोर्ट करत नव्हते, परंतु त्याची चाचणी सुरु आहे. WABetainfo या वेब पोर्टलने व्हाट्सअ‍ॅप वर डार्क मोड असल्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता,परंतु तो व्हाट्सअ‍ॅप चा नसल्याचे माहितीद्वारे समोर आले होते.

OLED स्क्रिनवर हा डार्क मोड पूर्णपणे काळ्या रंगाचा दिसून येतो. मात्र डेकस्टॉप असलेल्या मूळ रंगामध्ये फरक दिसून येत आहे. हा मोड सध्या वापरात नसला तरीही येत्या काळात डार्क मोड सार्वजनिक केला जाण्याचा अंदाज आहे.

या फीचरचा उपयोग ग्राहकांना होणार असून, यामुळे मोबाईलच्या बॅटरीची बचत होणार आहे. सध्याच्या युगात व्हाट्सअँप चे युजर्स वाढत आहेत, त्यामुळे व्हाट्सअँप नवनवीन फीचर्स ग्राहकांसाठी आणताना दिसत आहे.