WhatsApp वर येतंय जबरदस्त फीचर, 7 दिवसात आपोआप गायब होईल पाठवलेला मेसेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्याचे सर्वात महत्त्वाचे फीचर ‘Disappearing Message’आणण्याची तयारी करत आहे. WABetaInfo असे नमूद केले आहे की, कंपनी हे वैशिष्ट्य आगामी अपडेटसह सादर करेल. परंतु हे फीचर अस्तित्त्वात येण्यापूर्वी डब्ल्यूएबेटाइन्फोने त्याबद्दल बरीच माहिती शेअर केली आहे, ज्यामुळे हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल हे उघड झाले आहे. चला तर मग दिलेल्या तपशीलांविषयी जाणून घेऊया ….

कंपनीकडून असे सांगण्यात आले होते की, व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कधीही ‘Disappearing Message’ वापरू शकतात, परंतु या वैशिष्ट्यासह कस्टमाइज करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही. म्हणजेच एकदा आपण हे वैशिष्ट्य Enable केल्यास, येणारे सर्व नवीन संदेश 7 दिवसानंतर Expire होतील. याचा अर्थ असा आहे की, युजर्सला या वैशिष्ट्यासाठी मेसेज डिलीट करण्याची वेळ सेट करण्याचा ऑपशन मिळणार नाही.

WABetaInfo म्हणाले की, आपण 7 दिवस मेसेज उघडला नाही तर मेसेज गायब होईल, परंतु आपण नोटिफिकेशन पॅनेल क्लिअर न केल्यास आपण तेथून मेसेज तपासू शकाल.

याशिवाय हे देखील सांगण्यात आले की, जर एखाद्या Disappearing मेसेजला quote करुन उत्तर दिले तर सात दिवसानंतर quoted text चॅटमध्ये उपस्थित होतील. तसेच, जर Disappearing Message ला कोणत्या युजरला Forward केले जाते ज्याचे ‘disappearing message’ फिटर बंद असेल तर त्याच्याजवळ हे मेसेज गायब होणार नाही.

गूगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह होईल चॅट
माहितीनुसार, जर आपण चॅट गायब होण्यापूर्वी आपल्या चॅटचा बॅक अप घेतला तर आपणास गूगल ड्राईव्हमध्ये मेसेज सापडेल. तथापि, जर आपण गायब होणारे मेसेज बॅकअपमधून रिस्टोर करण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला ते मेसेज मिळणार नाहीत, कारण ते हटविले गेले असेल.

खास गोष्ट अशी आहे की, गायब होणाऱ्या मेसेजला फॉरवर्ड आणि त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, युजर्स त्यांच्या Disappearing Images आणि Video देखील कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करू शकतात. यासाठी तुम्हाला Save to Camera Roll ऑपशन मिळेल, जो तुम्हाला मॅन्युअली Enable करावा लागेल. अहवालानुसार, Disappearing Messages वैशिष्ट्य iOS, Android, KaiOS आणि Web/Desktop युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल.