×
Homeटेक्नोलाॅजीWhatsApp Down | व्हॉट्सॲप कधी सुरु होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

WhatsApp Down | व्हॉट्सॲप कधी सुरु होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तासाभरापूर्वी व्हॉट्सॲप WhatsApp हे समाज माध्यम अचानक बंद पडले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना डोकेदुखी (WhatsApp Down) झाली आहे. व्हॉट्सॲपवर कोणत्याबही प्रकारची सुविधा दिली जात नाही आहे. मॅसेज, फोटो, व्हिडिओ काही देखील एकमेकाला पाठविता येत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सॲपवर (WhatsApp Down) काम करणाऱ्या वापरकर्त्यांना मोठ्या संकंटाला सामोरे जावे लागत आहे. व्हॉट्सॲपची मालक कंपनी मेटा (Meta) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काही वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वापरताना समस्या येत आहेत. आम्ही त्यावर काम करत असून, लवकरच त्यावर उपाय काढून व्हॉट्सॲप WhatsApp सुरळीत केले जाईल. असे मेटाकडून कळविण्यात आले आहे.

मेटाच्या मालकीचे व्हॉट्सॲप सध्या बंद  आहे. त्यामुळे सेवांमध्ये समस्या येत आहेत. मेटाच्या प्रवक्त्यांनी लवकरच व्हॉट्सॲप पूर्ववत होईल, असे सांगितले आहे. आम्ही युद्धपातळीवर काम करत असल्याचे मेटाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप हे संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. जगभरातील लोक व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे त्याची वापरकर्त्यांची संख्या देखील मोठी आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा व्हॉट्सॲप बंद झाले होते. त्यानंतर कंपनीने उपाययोजना करत ते सुरु केले होते.

तासाभरापूर्वी व्हॉट्सॲप ग्रुप आणि खासगी कोणालाही मॅसेज पाठविता येत नव्हता.
त्यामुळे अनेकांनी त्याबाबद ट्वीट करत इतरांना माहिती दिली आहे.
व्हॉट्सॲप सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
व्हॉट्सॲपने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
तरी देखील त्यांच्याकडे यावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. व्हॉट्सॲप कधी सुरु होणार,
असा प्रश्न आता अनेकांकडून विचारण्यात येत आहे.

Web Title :- WhatsApp Down | as whatsapp goes down meta says working to restore services

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News