सेम-टू-सेम WhatsApp सारखी दिसतात ‘ही’ 3 बनावट Apps, चुकून देखील ‘डाऊनलोड’ नका करू, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : व्हाट्सअ‍ॅप एक अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप आहे, जे कोणत्याही फोनमध्ये पहिल्यांदा डाउनलोड केले जाते. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणूकीची अधिक प्रकरणे आढळली आहेत, जेथे व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट संदेशांद्वारे किंवा बनावट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वापरकर्त्यांची फसवणूक केली जाते. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपसारखे दिसणारे बनावट अ‍ॅपदेखील वापरकर्त्यांना फसवत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे बनावट अ‍ॅप वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. एका आफ्रिकेकन रिपोर्टनुसार, व्हॉट्स अ‍ॅपच्या अनऑफिशल व्हर्जन म्हणजेच बनावट अ‍ॅप काही देशांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. कॅरिबू डेटाचे सह-संस्थापक ब्रायन पोन यांनी सांगितले कि, ‘व्हॉट्स अ‍ॅप मोड्स’ सारख्या बनावट व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची वैशिष्ट्ये. हे बनावट अ‍ॅप मूळ व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा अधिक प्रगत वैशिष्ट्ये प्रदान करतात, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात.

याशिवाय सर्वात लोकप्रिय म्हणजे GB WhatsApp. हे व्हॉट्सअ‍ॅपसारखे असे अ‍ॅप आहे, जे वापरकर्त्यांनी स्टेटस हटविल्यानंतरही त्याला पाहण्याची सुविधा देते. तसेच डिलीट केलेले मेसेजही रिस्टोर करण्याचं सुविधा देते. एवढेच नाही तर ते 50MB फाइल्स पाठविण्याची परवानगी देतात, तर वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ 16MB एमबी फाइल्स पाठविता येतात. याशिवाय ‘ WhatsApp Plus ‘ देखील थर्ड पार्टी अ‍ॅप्सपैकी एक आहे. तसेच, ‘ YoWhatsApp ‘ आणि ‘ FMWhatsApp ‘ नावाची ही दोन अ‍ॅप्सदेखील बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत, जे अनधिकृत व्हॉट्सअ‍ॅप आहेत. माहितीनुसार नायजेरिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांमध्ये हे दोन्ही अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत.

महत्वाची गोष्ट 
व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीत म्हंटले आहे कि, व्हॉट्सअ‍ॅपचे थर्ड पार्टी अ‍ॅप GB WhatsApp आणि WhatsApp Plus वापरल्याने व्हॉट्सअ‍ॅप युजरला ‘तात्पुरती बंदी’ आणते. तर आपणही असे अ‍ॅप वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. व्हॉट्सअ‍ॅपच्या FAQ पेजवरही दिलेल्या माहितीनुसार, कंपनी असे करते कारण हे दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपची अधिकृत आवृत्ती नसून थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत. हे अनधिकृत अ‍ॅप्स तृतीय पक्षाद्वारे तयार केले जातात आणि ते व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचे उल्लंघन करते आणि व्हॉट्सअ‍ॅप त्यांचे समर्थन करत नाही.