मोठी बातमी ! 3 मोठे Social मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Facebook, Instagram होऊ शकतात ‘मर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामला फेसबुकचे विलीनीकरण होण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. फेसबुकने व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम ताब्यात घेतले होते, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर अशी अटकळ होती की, हे तीन प्लॅटफॉर्म एकत्र काम करण्यासाठी एकत्रित केले जाणार आहेत का? मागील वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी हे स्पष्ट केले होते की, त्यांच्याकडे भविष्यात एक अद्वितीय सेवा देण्यासाठी तीन प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना आहे.

फेसबुकचा हा थ्री इन वन प्लॅटफॉर्म
आता फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर एकत्र विलीन करण्याची तयारी करत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामचे युजर्ससुद्धा या प्लॅटफॉर्मवर आपापसात संवाद साधू शकतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची प्रचंड पोहोच पाहता असे म्हणता येईल की, फेसबुकचे हे थ्री इन वन प्लॅटफॉर्म व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या क्षेत्रातही गेम चेंजर ठरू शकतील.

तयार करत आहे डेटाबेस
WABetaInfo ने दिलेल्या अहवालात अशा संभाव्य फिचरकडे इशारा केला गेला आहे. WABetaInfo ने दिलेल्या अहवालानुसार, फेसबुक मेसेंजर वापरुन तीन प्लॅटफॉर्ममध्ये एक कनेक्शन तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. फेसबुक एक लोकल डेटाबेसमध्ये टेबल तयार करत आहे, जे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मेसेज आणि सेवेचे आयोजन करण्यात उपयुक्त ठरतील. यांचा वापर करून फेसबुक संपर्क क्रमांक आणि मेसेज आणि पुश नोटिफिकेशन्सच्या आवाजाला गोळा करू शकतील.

ही प्रक्रिया अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे फेसबुक आपल्या युजर्ससह इतर प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्याची ही सुविधा कधीपर्यंत विकसित करेल हे सांगणे कठीण जाईल. भविष्यात ही योजना आणखी वाढवली जाणार नाही, हे देखील शक्य आहे.