‘व्हाट्सअप’, ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’साठी लागणार आधार कार्ड ? SC नं मागितलं सोशल साईट्सकडे उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – व्हाट्सअप, फेसबुक आणि ट्विटरसाठी आता आधार कार्डशी जोडावे लागणार का ? फेसबुकच्या त्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणीसाठी तयार झाले आहे. यासंबंधात ४ याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्यात मद्रासमधून २, ओडिशामधून १ आणि मुंबईमधून १ आहे याचिका करण्यात आलेल्या आहेत.

युजर प्रोफाइलला आधार कार्ड लिंक करण्याच्या फेसबुकच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुगल,ट्विटर आणि इतर दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साईट्सला नोटीस देण्यात आली आहे.व्हाट्सअप कडून सांगण्यात आले आहे की, आम्ही पॉलिसी काय ठेवायची याचा निर्णय उच्च न्यायालय कसे ठरवणार कारण या संबंधीचे अधिकार संसदेकडे आहेत. त्यामुळे या सर्व केसेस सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर करण्याचे ठरवले आहे.ज्यात सुप्रीम कोर्ट पूर्ण गोष्टी माहित करून घेईल आणि यावर सुनावणी करेल.

यावर सुप्रीम कोर्टाने सोशल नेटवर्किंग साईट्सला आधार जोडण्याविषयीची सुनावणी मद्रास हायकोर्टात सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे मात्र यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार मद्रास न्यायालयाला असणार नाही.

फेसबुकने सुद्धा सुप्रीम कोर्टानेच यावर निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने फेसबुककडे विचारणा केली होती की,मद्रास हायकोर्टाकडे किती याचिका पेंडिंग आहेत यावर फेसबुकने २ याचिका मद्रास कोर्टात असल्याची माहिती दिली.

कपिल सिब्बल यांनी सांगितले की, सरकारने नोटीस काढून सोशल मीडियाला सुद्धा याबद्दल विचारले पाहिजे. AG ने याबाबत विचारणा केली असता फेसबुकने सांगितले की आम्ही हाय कोर्टाच्या निर्णयाला मानतो. AG चे म्हणणे आहे की फेसबुकवरील त्या पोस्टची माहिती मिळायला हवी ज्यातून आत्महत्येला प्रवृत्त होणारे संदेश येतात.

यावर कपिल सिब्बल यांनी सांगितले की,आता असे अनेक ऍप आहेत ज्यांच्यामार्फत एका दुसऱ्यांच्या नावाने मेसेज पाठवता येतो. असे झाले तर कोणीही कोणाला अडकवले हे खूप गंभीर आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी करणे गरजेचे आहे.

सुप्रीम कोर्टाने याबाबत सर्व सोशल मीडियाला नोटीस दिल्या आहेत आणि २ सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात येणार आहे. यावरील पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like