WhatsApp आणि सोशल साईट्सच्या ‘पासवर्ड’मुळे अनेकांच्या संसारात ‘बिब्बा’, पती-पत्नीचा एकमेकांवर ‘वॉच’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावरून नवरा बायको मध्ये अनेकदा भांडण होते आणि पुढे जाऊन याच भांडणाचे रूपांतर दोघे वेगळे होण्यामध्ये होते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करणे कधीही चांगले आहे. अनेकदा यांच्या अती वापरामुळे नात्यांमध्ये वाद निर्माण होतात.

नात्यामध्ये येत चालला आहे दुरावा
वॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियामुळे एकमेकांच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहण्यासाठी अनेकदा पासवर्ड मागितला जातो आणि यातूनच पती पत्नी यांच्यातील वादाला सुरुवात होते. यामध्ये प्रमुख शहरांतील सुशिक्षित लोकांचा देखील समावेश होत चालला आहे. जेव्हा दोघेही नोकरी करत असतील तेव्हा अशा गोष्टींचे प्रमाण वाढत असल्याचे समजते. महिला हेल्पलाइनवर याबाबत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

चॅट आणि कॉल डिलीट केल्याने देखील होतात वाद
हेल्पलाइनवरील काही प्रकरणांची चौकशी सुरु आहे. त्यानुसार वॉट्सअ‍ॅपवरील चॅट डिलीट केल्याने देखील भांडणाला सुरुवात झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये काही महिला आणि पुरुषांचे म्हणणे आहे की खाजगी आयुष्यासाठी ते पासवर्ड शेअर करू इच्छित नाही. परंतु नाते संबंध लक्षात घेऊन त्यांना समजू लागले आहे.

छोटा वाद देखील घेत आहे गंभीर स्वरूप
पती पत्नीतील काही छोटे वाद देखील गंभीर रूप घेत आहेत. यामाध्ये पुरुषांसोबत महिलांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. काहीतरी चुकीचे असेल तरच दोघांमधील एक जण लपवण्याचा प्रयत्न करत असतो अशी माहिती महिला हेल्पलाइनच्या प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या प्रमिला कुमारी यांनी दिली आहे.

सोशल मीडियामुळे नात्यात मतभेद
सोशल मीडियामुळे तरुणांसोबत प्रौढ व्यक्तीमध्ये देखील वाद निर्माण होत आहेत त्यामुळे जेवढा एकमेकांना वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक विचार करण्यापेक्षा एक मेकांशी खुलेपणाने संभाषण करा असा सल्ला महिला हेल्पलाइनच्या काऊन्सलर सरिता सजल यांनी दिला आहे.

परस्पर समरसतेचा अभाव
2005 नंतर नाती तुटण्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. आता मुली देखील वर्किंग आहेत आणि विचार भिन्नतेमुळे लोकांच्या विचारांत देखील फरक जाणवतो. त्यामुळे मोबाइल द्वारे देखील नात्यांमध्ये कटुता येत आहे असे मत रंधीर कुमार सिंह यांनी व्यक्त केले आहे.

अशाप्रकारे तुटत आहेत नाती याची दोन उदाहरणे पाहुयात

केस 1
बोरिंग रोड येथे राहणारी रमा (काल्पनिक नाव) ला आपल्या नवऱ्यावर संशय होता की त्याचे दुसऱ्या ठिकाणी संबंध सुरु आहेत. तिने अनेकदा आपल्या नवऱ्याकडे फोन आणि वॉट्सअ‍ॅपचा पासवर्ड मागितला परंतु न दिल्याने तिने फोन आणि आपला सोशल मीडिया सिक्युअर केला. जेव्हा तिच्या नवऱ्याला याबाबत समजले तेव्हा त्याने रमाला मारहाण केली आणि फोन अनलॉक केला. त्यानंतर रमाने महिला हेल्पलाईमध्ये तक्रार केली.

केस 2
अनिसाबाद येथे राहणारी अनिता(काल्पनिक नाव) हेल्पलाइनमध्ये तक्रार करत सांगितले की, पतीकडे दोन फोन आहेत परंतु ते एकाही फोनचा वापर करू देत नाहीत. लग्नाला वीस वर्ष झाली आहेत. मात्र गेल्या एक वर्षांपासून त्यांनी फोनला फिंगर लॉक लावायला सुरु केली आहे. विचारल्यावर भांडतात आणि मारहाण करतात त्यामुळे याबाबत सध्या सुनावणी सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like