‘WhatsApp’वर फॉरवर्ड होतोय ‘हा’ फेक ‘मेसेज’ ; तुम्ही चुकून ही ‘शेअर’ करू नका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर रोज हजारो मेसेज येत असतात, त्यातील अनेक मेसेजेस तर FAKE (खोटे) असतात. अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजसची संख्या आधिक आहे. असाच एक मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे.

मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि इंस्टाग्राम सारखे अ‍ॅप चालू शकते नव्हते. या दरम्यान भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर काही युजर्सला एक मेसेज येण्यास सुरुवात झाली होती की, हे अ‍ॅप रोज ११.३० ते ६.०० या दरम्यान बंद असतील. या बरोबर वापरकर्तांना सांगण्यात आले की, हे मेसेज इतर लोकांना देखील पाठवा. नाहीतर त्यांचे व्हॉट्स अ‍ॅप बंद होईल, आणि पुन्हा सुरु करण्यासाठी पैसेे लागू शकतात.

असा होता संपुर्ण मेसेज –

पाहा, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप आज रात्री ११.३० ते ६.०० पर्यंत काम करणार नाही. हे दिल्ली सरकारने सांगितले आहे. हा निर्णय मोदी सरकारचा आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपचा ओवर वापर होण्यास सुरुवात झाली आहे. हा मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा. जर तुम्ही हा मेसेज तुमच्या सर्व संपर्कात पाठवला नाही. तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप ४८ तासात क्रॅश होईल. आणि पुन्हा अकाऊंट ओपन करण्याचा तुम्ही वापर केला. तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. हा शुल्क ४९९ रुपये असेल आणि ते तुम्हाला दरमहा भरावे लागेल. आता एक समस्या उद्भवेल की मोबाईल हॅग होईल. फोटो स्पष्ट दिसणार नाहीत. स्टेट्स लवकर दिसणार नाही. या समस्येला सोडवण्याचा पुर्ण प्रयत्न सरकार करत आहे. नवे व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्यासाठी ८ जणांना मेसेज सेंड करा.

फेक आहेत असे मेसेज –

असे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असतात. अशा फेक मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका, हे सर्व मेसेज पुर्णता फेक आहेत. सरकारकडून असे काहीही सूचना करण्यात आलेले नाही. यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू तुम्ही ते पुढे फॉरवर्ड करु नका.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?