WhatsApp डिलीट झाले तरी सगळी चॅटिंग दिसणार आहे तशीच, फक्त बदलावी लागेल ‘ही’ सेटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर आजकाल प्रत्येकाचे जीवन इतके जोडले गेलेले आहे की प्रत्येक कामामध्ये त्याचा वापर होऊ लागला आहे. सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. व्हाट्सअप वर आजकाल प्रत्येकजण इतका व्यस्त असतो आणि अनेक महत्वाच्या कामांसाठी व्हाट्सअ‍ॅप चा वापर करत असतो अशातच समजा अचानक व्हाट्सअप वरील सर्व मेसेज दिलीत झाले तर ? तर वापरकर्त्याला नक्कीच मोठा झटका लागेल.

तर अशाच एखाद्या चुकीमुळे तुमचे सर्व मेसेज गेले तर तुम्ही ते परत आणू शकता व्हाट्सअपमध्ये बॅकअप नावाचा एक पर्याय देण्यात आला आहे. ज्याद्वारे संपूर्ण चाट हिस्ट्री पुन्हा येऊ शकते. आठवड्याला किंवा महिन्याला आपोआप बॅकअप घेण्याची सुविधाही यात देण्यात आलेली आहे. हा बॅकअप थेट वापरकर्त्याच्या गुगल ड्राइव्हवर जातो. बॅकअप द्वारे फक्त मेसेजचं नाही तर ऑडिओ संदेश, फोटो व इतर फाईलही परत मिळू शकतात.

बॅकअप घेण्यासाठीची प्रोसेस पुढीलप्रमाणे

मेन्यू मध्ये जाऊन सेटिंग मध्ये जावे.
चाट नावाचा पर्याय निवडून चाट बॅकअप वर क्लीक करावे.
त्यानंतर थोड्याच अवधीत बॅकअप पूर्णपणे घेतला जाईल.
बॅकअप घेताना इंटरनेटशी जोडलेले राहणे फार महत्वाचे आहे.

ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा सेट केला जाऊ शकतो बॅकअप
बॅकअप घेण्यासाठी प्रत्येक वेळी प्रोसेस करणे गरजेचे नाही बॅकअप घेताना हा पर्याय मिळतो कि ऑटो पद्धतीने बॅकअप घेतला जाईल मग त्यात डेली, विकली , मंथली असे पर्याय मिळतील आपल्या गरजेनुसार पर्याय निवडल्यावर आपल्या गुगल ड्राईव्ह वरती आपोआप बॅकअप जमा होत जाईल.