WhatsApp Feature | WhatsApp वर नवीन फिचर, वाढणार ग्रुप Admin ची पॉवर; मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Feature | तुम्ही WhatsApp वापरत असाल आणि या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप वरील (Instant Messaging App) ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. WhatsApp आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी नवीन अपडेट आणि फीचर्स (WhatsApp Feature) आणत असते. यामध्ये आता WhatsApp एकाचवेळी दोन नवीन फीचर्स जारी करणार आहे. या फिर्चर्सच्या मदतीने ग्रुप अ‍ॅडमिनची (Group Admin) पॉवर वाढणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा करताना WhatsApp ग्रुपसाठी दोन नवीन अपडेट जारी करीत असल्याचे सांगितले आहे. यामुळे ग्रुप अ‍ॅडमिन आपल्या ग्रुप प्रायव्हसीवर जास्त कंट्रोल करू शकतील.

अ‍ॅडमिनसाठी पॉवरफुल फीचर

मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले, मागील काही महिन्यांपासून काही नवी अपडेट (WhatsApp New Update) करण्यात येत आहेत. ज्यातून आता ग्रुपला मोठे करणे आणि अ‍ॅडमिनला स्वत:ग्रुपला मॅनेज करण्यासाठी, ग्रुपमधील कोणत्याही सदस्याच्या मेसेज आक्षेपार्ह वाटल्यास तो मसेज हटवता येईल.

ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुप मॅनेज करणे होणार सोपे

मेटाना यासंदर्भात सांगितले की, ग्रुप अजूनही WhatsApp चे एक खास भाग आहे. ग्रुपमधून जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी आणखी टूल देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज आम्ही गुपला आणखी मजेदार बनवण्यासाठी काही नियमात बदल करण्यासाठी उत्सूक आहोत. यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुप मॅनेज करणे आणि सर्वांसाठी नेविगेट करण्यास सोपे जाईल.

नव्या अपडेटमध्ये मिळणार ही सुविधा

WhatsApp च्या नवीन फीचर (WhatsApp Feature) मध्ये ग्रुपमध्ये कोणाला घ्यायचे आहे याचे अधिकार
ग्रुप अ‍ॅडमिनला मिळणार आहेत. याशिवाय नवीन फीचरमुळे कोणता व्यक्ती ग्रुपमध्ये सहभागी होवू शकतो
किंवा नाही याची देखील अ‍ॅडमिनला मदत मिळणार आहे. या टूलचा सर्वाधिक फायदा ग्रुपला होणार आहे.
जे लोक सर्वांशी काही गोष्टी खासगीत बोलतात. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे की, अ‍ॅडमिन सहज ठरवू शकतो की,
कोणाला ग्रुपमध्ये घ्यायचे किंवा नाही.

Web Title :- WhatsApp Feature | whatsapp announces new group features for group admins to get greater control over

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी

Chandrapur Crime News | खळबळजनक ! पहाटेच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आढळले दोघांचे मृतदेह