‘Android’ यूजर्ससाठी प्रतिक्षेनंतर ‘WhatsApp’ चं ‘हे’ खास ‘फिचर’ लॉन्च, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp ने बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनचे फीचर अ‍ॅण्ड्राइड स्मार्टफोनसाठी सादर केले आहे. याआधी हे फीचर iOS ला देण्यात आले होते, ज्यात यूजर फेस आयडीने व्हॉट्सअ‍ॅप सिक्युअर करु शकतील. ना की फक्त फेस आयडी तर ज्या आयफोनमध्ये टच आयडी आहे त्यांनी देखील हे फीचर पहिल्यांदाच देण्यात आले होते.

WhatsApp ने सांगितले की ज्या अ‍ॅण्ड्राइड स्मार्टफोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत, त्यांना फिगरप्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप लॉक करण्याचे फीचर मिळेल. हे तुम्ही मॅन्युअली वापरु शकतात.

WhatsApp ने आपल्या आधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले की, वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने आयफोनला हे फीचर दिले आहे, आता असेच आयडेंटीफिकेशन अ‍ॅण्ड्राइड स्मार्टफोनसाठी लॉन्च करण्यात आले आहे.

अ‍ॅण्ड्राइड युजर्स असे सेट करु शकतात फिंगरप्रिंट लॉक –
WhatsApp सुरु केल्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन Account सेलेक्ट करावे लागेल. त्यानंतर Privacy मध्ये Fingerprint लॉक हा पर्याय मिळेल. हे ऑन करुन तुम्ही कन्फर्म करु शकतात. यानंतर WhatsApp ओपन करण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल.

Android मध्ये अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप आहेत जे लोक WhatsApp आणि इतर अ‍ॅप्सच्या लॉकसाठी वापरत आहेत. परंतू व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरनंतर यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅपसाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करण्याची गरज भासणार नाही.

Visit : Policenama.com