Android वापरकर्त्यांसाठी WhatsApp ने आणले हे खास फीचर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हाट्सअ‍ॅप ने नुकतीच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन या नवीन फीचरची सुरुवात केली. कंपनीने आधी केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी फिंगरप्रिंट आणि फेस आयडी चे फिचर दिले होते. आता कंपनी अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी असेच वैशिष्ट्य आणण्याची तयारी करत आहे.

हे वैशिष्ट्य व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा आवृत्ती २.१९.२२१ मध्ये देण्यात आले आहे. या बीटा बिल्डद्वारे, वापरकर्ते त्यांच्या Android स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर ची सुरक्षितता वापरू शकणार आहेत.

असे करा फिंगरप्रिंट व्हेरीफिकेशन :
यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जवर जावे लागेल. तेथील Account मध्ये Privacy सेटिंग मध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Verification) चा ऑप्शन असेल वापरकर्त्यांना ते इनेबल करावे लागेल. iOS प्रमाणेच येथे देखील बायोमेट्रिक प्रमाणीकरणा साठी immediately, after 1 minute आणि 30 minute असे तीन पर्याय असतील. येथून आपण हे ठरवू शकता की आपल्याला किती वेळानंतर लॉक करायचे आहे. त्यानंतर हे अ‍ॅप तुमच्या फिंगरप्रिंट नंतरच उघडेल. हे वैशिष्ठ्य Android च्या Marshmallow आणि त्यावरील व्हर्जनसाठीच असणार आहे.

तुमचा फिंगरप्रिंट डेटा आणि अन्य खाजगी माहिती सुरक्षित :
WABetainfo च्या अहवालानुसार, फिंगरप्रिंट डेटा सुरक्षित आहे. कारण ते इतर अ‍ॅप्स प्रमाणे फिंगरप्रिंट डेटामध्ये प्रवेश करत नसून यासाठी व्हाट्सअ‍ॅप अधिकृत अ‍ॅन्ड्रॉइड एपीआय चा वापर करते. त्यामुळे फेसबुक किंवा व्हाट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवर हा गोपनीय डेटा पाठविला जात नाही. या नवीन फीचरसाठी तुम्हाला तुमचे व्हाट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. तरीदेखील हे फिचर मिळत नसल्यास काही काळ थांबा आणि नंतर उपडेटेड व्हर्जन मिळाल्यानंतर पुन्हा उपडेट करा.

आरोग्यविषयक वृत्त