ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

WhatsApp Fraud | व्हॉट्सअपवरील ‘हॅलो मम’ आणि ‘हॅलो डॅड’ मेसेजपासून रहा सावध, ‘या’ नवीन सायबर फ्रॉडमुळं रिकामं होतंय बँक अकाऊंट; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Fraud | सायबर फ्रॉड (Cyber Crime) आता प्रत्येक क्षेत्रात होत आहेत. बँक अकाऊंट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सर्व ठिकाणी हा उपद्रव सुरू आहे. इंटरनेटचे जग वाढण्यासह ऑनलाइन फ्रॉडच्या पद्धतींमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. असाच एक फ्रॉड मेसेंजर प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp fraud) वर दिसून येत आहे. हा फ्रॉड नवीन आहे यासाठी यूजरला जास्त सावध राहण्याची गरज आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन फ्रॉड ब्रिटनमध्येसमोर आला आहे. हा सायबर स्कॅम एका व्हॉट्सअपॅप मेसेजने सुरू होतो. ज्यामध्ये यूजरला मेसेज पाठवून फसवले जाते. या स्कॅम (WhatsApp fraud) किंवा घोटाळ्यात सायबर गुन्हेगार यूजरला ‘हेलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ लिहून पाठवतात.

 

यानंतर ताबडतोब एक एसओएस पाठवला जातो ज्यामध्ये म्हटले जाते तुमचा मुलगा किंवा मुलगी संकटात आहे आणि त्यास पैशांची तातडीने गरज आहे. ब्रिटनमध्ये काही महिन्यात लोकांच्या खात्यातून 50,000 पाऊंडपर्यंत काढण्यात आले आहेत.

कशी होते फसवणूक
या मेसेजने आई-वडील किंवा पालकांना वाटते की, त्यांच्या मुलाला पैशांची सक्त गरज आहे आणि ते सांगितलेल्या लिंकवर क्लिक करून पैसे पाठवतात. आई-वडील काहीही चौकशी न करता ताबडतोब पैसे पाठवतात.

 

मेसेजमध्ये हे सुद्धा लिहिलेले असते की, दुसर्‍या व्यक्तीच्या मोबाइलवरून मेसेज करत आहेत कारण माझा मोबाईल चोरीला गेला आहे.
मेसेज (WhatsApp fraud) मध्ये लिहिलेले असते की, नवीन फोन खरेदी करण्यासाठी किंवा मोबाईल बिल भरण्यासाठी पैशांची सक्त गरज आहे.
अशा मेसेजने आई-वडीलांना चिंता वाटते आणि ते ताबडतोब दिलेल्या बँक डिटेलवर पैसे पाठवतात. असे अनेक फ्रॉड ब्रिटनमध्ये उघडकीस आले आहेत.

 

Web Title :- Whatsapp Fraud | whatsapp fraud beware of new cyber scam text it could cost you thousands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mouni Roy | समुद्रामध्ये मौनी रॉयनं दिल्या बोल्ड पोज, हॉट फोटो पाहून चाहते म्हणाले – ‘मार डाला रे…’

Aadhaar Card | तुमच्या ‘आधार’ द्वारे किती Sim झाले अ‍ॅक्टिव्हेट, ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन जाणून घ्या

Imported liquor Rates | मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! विदेशी दारू झाली स्वस्त, आयातीचे विशेष शुल्क दर कमी केल्याने किंमत निम्यावर

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

 

Back to top button