‘WhatsApp’ वरील मेसेज Forward करत असाल तर ‘ही’ गोष्ट जाणून घ्याच, झालेत ‘हे’ बदल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने आता एक नवीन महत्त्वाचे फिचर सुरु केले आहे. या नवीन फिचर मुळे तुम्हाला आलेला मेसेज नक्की किती वेळा फॉरवर्ड केला गेलेला आहे याची माहिती मिळणार आहे. हे फीचर Android आणि iPhone च्या वापरकर्त्यांना दिले जाणार आहे. हे वैशिष्ठय Frequently Forwarded मेसेजेस साठी असून याच्या साहाय्याने वापरकर्त्याला कोणताही व्हायरल मेसेज फॉरवर्ड केल्या जाण्याची फ्रीक्वेंसी काय आहे यासंदर्भात माहिती मिळणार आहे. पाचपेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर आता Frequently Forwarded चे हे लेबल दिसेल.

व्हाट्सअ‍ॅप लेटेस्ट व्हर्जन मध्ये हे फिचर दिलेले असून याआधीदेखील कंपनीने फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर एक चिन्ह द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये एक सिंगल अ‍ॅरो मेसेजवर दिसतो ज्याचा अर्थ हा मेसेज फॉरवर्डेड आहे. आता येणाऱ्या नवीन अ‍ॅप वरील लेबल डबल अ‍ॅरो वाले असणार आहे.

व्हाट्सअ‍ॅप ने म्हटले की आम्ही वापरकर्त्यांची Privacy आणि Intimacy सांभाळण्यासाठी फॉर्वर्ड मेसेजला मर्यादित करत आहोत. एका वेळी केवळ पाच लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येऊ शकतात. एक मेसेज पाचहून अधिकवेळा फॉरवर्ड केला गेल्यास त्याला Double Arrow चे लेबल मिळेल. मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे एंड टु एंड एन्क्रिप्टेड होत असते. तसेच असे फॉरवर्ड मेसेज वापरकर्त्याने फॉरवर्ड केल्यास त्याला एक नोटीसदेखील दिसणार आहे. यामुळे व्हाट्सअ‍ॅप वर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांना लगाम देखील लगाम बसविला जाईल अशी माहिती व्हाट्सअ‍ॅप च्या एका प्रवक्त्याने माहिती दिली.

WhatsApp आणणार नवीन वेब व्हर्जन

WABetaInfo ने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार कंपनी एका ‘युनिवर्सल विंडोज़ प्लॅटफॉर्म(UWP)’ अ‍ॅप वर काम करत असून ज्याद्वारे एक असा मल्टी प्लॅटफॉर्म सिस्टम देखील आणणार असून त्यामुळे तुमचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर देखील वेब वर WhatsApp चालवता येऊ शकेल. यामुळे वापरकर्ते एकच अकाउंट एका वेळी अनेक उपकरणांवर लॉगिन करू शकणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

 

You might also like