‘WhatsApp’ चं नवीन ‘फिचर’, परवानगी शिवाय कोणालाही कोणत्या पण ग्रुपमध्ये ‘अ‍ॅड’ करता येणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने काही महिन्यापूर्वी भारतीय यूजर्ससाठी एक नवे प्रायवेसी फीचर लॉन्च केले. हे प्रायवसी फिचर खास करुन ग्रुपसाठी आहे. कंपनीने सांगितले की फीचर अ‍ॅण्ड्राइड आणि iOS यूजर्सला दिले आहेत. याअंतर्गत कोणत्याही यूजरच्या परमिशनसाठी कोणताही दुसरा युजर त्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकणार नाही.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार कंपनी या फीचरचा सपोर्ट वाढवत आहे. या ब्लॅगमध्ये सांगितले की, कंपनी टेस्ट वाढवत आहे. ग्रुप प्रायवेसी सेटिंग्स आता जास्तीत जास्त अ‍ॅण्ड्राइड आणि आयओएस यूजरला देण्यात आले आहे. हे आवश्यक आहे कारणं कोणत्याही यूजरला त्यांच्या मर्जीनुसार ग्रुपमध्ये अ‍ॅड करता येत होते.

तुम्ही हे फीचर अपडेट करुन नवे फीचर अनुभवी शकतात. येथे तुम्हाला ही स्क्रीन मिळेल जेथे एका ग्रुपमध्ये प्रायवेसी सेटिंग्ससंबंधित सांगण्यात येईल.

या प्रायवेसी सेटिंगमध्ये तुम्हाला काही पर्याय मिळेल, यात Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय मिळतील. जर तुम्ही Nobody सिलेक्ट केले आणि तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये अ‍ॅड केले तर तुम्हाला एक इन्विटेशन रिक्वेस्ट मिळेल. जी तुम्ही अक्सेप्ट आणि डिक्लाइन करु शकतात. अपडेटनंतर Nobody फीचरला रिप्लेस करण्यात आले आहे.

WhatsApp च्या या ग्रुप प्रायवेसी सेटिंग्स या अपडेट बरोबर Nobody फीचरला रिप्लेस करण्यात आले आहे. आता याची जागा My contacts except हा पर्याय घेईल. म्हणजेच तुम्ही निश्चित करु शकाल की तुम्हाला कॉन्टॅक्ट्समध्ये कोण ग्रुप अ‍ॅड करु शकते आणि कोण नाही.

WhatsApp iOS मध्ये हे फीचर बीटा अपडेटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, परंतू फायनल बिल्ड कधी येईल हे अजून स्पष्ट झाले नाही.

Visit : Policenama.com