WhatsApp द्वारे हॅकर्स ‘या’ पध्दतीनं करू शकतात तुमचे बँक अकाऊंट रिकामे, बचावासाठी अवलंबा ‘या’ टिप्स; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आता केवळ मेसेज करण्यापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. यूजर्स आपले लोकेशन सांगण्यापासून पेमेंटपर्यंत याचा वापर करतात. परंतु हे इतके पॉप्युलर असल्याने हॅकर्सचे सुद्धा याच्यावर लक्ष असते. आता या अॅपद्वारे ऑनलाइन बँक फ्रॉड होऊ शकतो. सोबतच ई-वॉलेट अकाऊंट आणि यूपीआय सुद्धा हॅक करू शकतात. WhatsApp हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात.
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हॅकर्सपासून करा असा बचाव
– अनोळखी व्यक्तीने कॉन्टॅक्ट केल्यास रिप्लाय करू नका. याशिवाय कुणी अनोळखी व्यक्तीने लिंक शेयर केली तर ती उघडू नका.
– कधीही कुणाशी आपल्या बँक डिटेल शेयर करू नका. जर कुणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा पिन आणि इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड मागितला तर तो देऊ नका.
– एखाद्या नंबरवरून एखादी मीडिया फाईल आली तर ती कधीही डाऊनलोड करू नका. त्या फाईलमध्ये व्हायरस असू शकतो जो तुमचे अकाऊंट हॅक करू शकतो.
– आपल्या फोनमध्ये ऑटो डाऊनलोड डिसेबल करा. व्हॉट्सअपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा आणि स्टोरेज यूजेसमध्ये जाऊन सेटिंग्ज चेंज करा. यामुळे कोणतीही फाईल आपोआप डाऊनलोड होणार नाही.
– कोणतेही छोटे-मोठे ट्रान्जक्शन जे बँक अकाऊंटमधून केले असेल किंवा ईवॉलेट, त्यासाठी फोनमध्ये जो ओटीपी येतो तो कुणाशीही शेयर करू नका.
– जर फोन हरवला तर सर्वप्रथम व्हॉट्सअॅप डीअॅक्टिव्हेट करा. यासाठी तुम्ही [email protected] वर ईमेल करू शकता.
किंवा एखाद्या दुसर्या फोनवरून व्हॉट्सअपॅपमध्ये लॉगीन करून नंतर व्हॉट्सअप डिलिट किंवा डीअॅक्टिव्ह करू शकता.
– फोन बदलल्यास प्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन फोनचा सर्व डेटा डिलिट करा आणि त्यास फॅक्टरी व्हर्जनवर रिसेट करा, जेणेकरून तुमची माहिती सुरक्षित राहील.
– अनोळखी किंवा पब्लिक वाय-फाय यूज करणे टाळा, यातून हॅकिंगची शक्यता वाढते.
अनेकदा हॅकर्स वाय-फायवरून तुमचा फोन हॅक करून ऑनलाइन फ्रॉड करू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Web Title : WhatsApp | hackers can do bank fraud with you through
whatsapp here are the tips to avoid them
हे देखील वाचा
EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम