सावधान ! ‘WhatsApp’वर होतोय ‘हा’ मेसेज व्हायरल, तुम्ही पडू नका ‘क्लिक फ्रॉड’ला बळी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये १,००० GB इंटरनेट डेटा मोफत मिळेल असा आशय देण्यात आला आहे. परंतू हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. असा मेसेज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर आला असेल तर वेळीच सावध व्हा. या मेसेजच्या माध्यामातून व्हॉट्सअॅपवर एक ‘स्कॅम’ चालू आहे.
असा आहे मेसेज –
व्हॉट्स अॅपवर १,००० जीबी मोफत इंटरनेट म्हणून एक मेसेज व्हायरल होत आहेत. त्यात, व्हॉट्सअॅप यावर्षी १० वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणून ग्राहकांना १,००० जीबी मोफत इंटरनेट डाटा देण्यात येत आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि मोफत डेटा मिळवा असे लिहिण्यात आले आहे.
या मेसेज मधील लिंक ओपन केल्यावर एक पेज ओपन होते. यात लिहिले आहे की तुम्हाला १,००० जीबी मोफत इंटरनेटची ऑफर देण्यात येईल. ही ऑफर मर्यादित काळापूर्ती आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा मेसेज पाठवा असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे.
एक प्रकारचा स्कॅम –
हा मेसेज एक स्कॅम असल्याचे सांगण्यात येत आहे. यात देण्यात आलेल्या लिंक वर किल्क करु नका. अशा स्कॅममधून घोटाळेबाज भरपूर पैसे कमावतात. याशिवाय यात जी लिंक देण्यात आली आहे ती व्हॉट्सअॅपची अधिकृत वेबसाइट नाही. असे मेसेज फोरवर्ड करुन यूजर्सची फसवणूक केली जाते. असे सायबर सिक्युरिटी फर्म ESET ने सांगितले आहे. या अशा मेसेजसमधून खासगी महिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे यूजर्सने अशा मेसेजपासून सावध राहावे.
- व्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध
- महिलांच्या ‘मासिक’ चक्रासह कामेच्छाही ‘प्रभावित’ करतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- कॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, जाणून घ्या
- ‘कफ’, ‘पित्त’ आणि ‘वात’ का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
- मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या
- डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम
- ‘या’ धातूच्या भांड्यातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या
- पौष्टिक तत्त्वे वाढवण्यासाठी भाज्या खाण्याच्या ७ सोप्या पद्धती, जाणून घ्या
- शुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे
- ‘या’ १० गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी