कामाची गोष्ट ! WhatsApp ‘हॅक’ होऊ नये यासाठी Setting बदलणे खुप गरजेचे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्हॉट्सअ‍ॅप हॅक होण्याच्या बातम्या अलिकडे आपण सतत ऐकत आहोत, यामुळे प्रत्येकाला व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बेजॉस यांचा फोन हॅक केल्याचे हे वृत्त होते. अशा वृत्तांमुळे व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या सुरक्षेबाबत अनेकांना काळजी वाटते. हॅकींगचे हे प्रकार प्रथमच समोर आले नसून यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेत काही कमतरता असल्याने 1.6 अरब यूजर्सला त्याचे नुकसान सोसावे लागू शकते, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा असू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आपले व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित रहावे आणि कुणी ते हॅक करू नये तर तुम्हाला त्याच्या सेटींगमध्ये काही खास बदल करण्याची गरज आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हॅक होण्यापासून असा करू शकता बचाव…

सर्वातआधी आपल्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. यानंतर सेटींग्जवर क्लिक करा. यानंतर अकाउंटवर क्लिक करा.

आता तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा त्यास एनेबल करावे लागेल.

यानंतर तुम्हाला एक 6 अंकी पीन क्रिएट करावा लागेल. याचा फायदा हा होईल की कोणत्याही नव्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेटींग करताना या पिनची गरज भासेल.

नोट : हा पिन त्या व्हेरिफिकेशन कोड आणि एसएमएसपेक्षा वेगळा असेल जो व्हॉट्सअ‍ॅप सेटअपदरम्यान येतो. टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडद्वारे पिन क्रिएट केल्यानंतर तुमच्याजवळ ईमेल अ‍ॅड्रेस लिंक करण्याचा ऑपशन असेल. जर तुम्ही तुमचा पिन विसरलात तर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला मेल करून व्हेरिफिकेशन लिंक पाठवेल.