आता ‘या’ फोन्सवर ‘WhatsApp’ चालणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  सोशल मिडिया वापरणाऱ्या यूजर्ससाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे की व्हॉट्सअ‍ॅप कदाचित तुमच्या डिव्हाइसला सपोर्ट करणार नाही. एका वृत्तानुसार व्हॉट्सअ‍ॅप काही आयएसओ आणि अ‍ॅण्ड्राइड डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले की, आता काही स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅपचे नवे अपडेट मिळणार नाही.

या संदर्भात WABetaInfo ने ट्विट करत माहिती दिली की आयएसओ 8 या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर आता व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.  हेच अ‍ॅण्ड्राइड 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमच्या अ‍ॅण्ड्राइडला देखील लागू असेल. या सिस्टमसाठी ही सेवा 1 फेब्रुवारी 2020 पासून बंद होणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार या जुन्या सिस्टिमवर नवीन व्हॉट्सअ‍ॅपचे अकाऊंट सुरु करता येणार नाही. तसेच अकाऊंट वेरिफाय करता येणार नाही. आधीच जर तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल असेल तर ते काम करत राहिलं.

– अ‍ॅण्ड्रॅाइड व्हर्जन 2.3.7 किंवा या पेक्षा जुने व्हर्जन – (1 फेब्रुवारी 2020 पर्यंत)
– आयओेएस 8 किंवा त्यापेक्षा जुने व्हर्जन (1 फेब्रुवारी 2020 पर्यंत)
– तर विंडोज ऑपरेटींग सिस्टिमच्या फोनसाठी (31 डिसेंबर पर्यंत)
या तारखांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप काम करेल. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून काढून टाकण्यात येणार आहे.

Visit : policenama.com

You might also like