आता ‘WhatsApp’ वापरा थेट ‘डेक्सटॉप’वर, लवकरच येणार नवे वर्जन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप आपल्या डेस्कटॉप वर्जन काम करत आहे जेणे करुन आपण मोबाईलचे इंटरनेट कनेक्ट न करता यूजर्स मॅसेजिंग अ‍ॅपचा वापर डेस्कटॉपवर करु शकतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब वर्जनला २०१५ मध्ये व्हाट्सअ‍ॅपने लॉन्च केले होते. ज्याआधारे कंप्युटरवर आता चॅट करता येते. परंतू सध्या याच्या वापरासाठी यूजर्सला मोबाईलला इंटरनेटच्या माध्यमातून जोडावे लागते.

विश्वसनीय व्हॉट्सअ‍ॅप लीकर अकाऊंट डब्ल्यूबीटाइंफोने शुक्रवारी या संबंधित ट्विट करत माहिती दिली आहे. या सांगण्यात आले आहे की, कंपनी एक यूनिवर्सल प्लेटफॉर्म अ‍ॅप विकासित करत आहे. या शिवाय कंपनी एक मल्टी प्लॅटफॉर्म सिस्टमवर काम करण्यात येत आहे. जे तुमचे फोन बंद झाल्यानंतर देखील काम करेल. याशिवाय मल्टीप्लेटफॉर्म सिस्टिमवर कराम करण्यात येत आहे. ज्यामुळे यूजर्स एकावेळी अनेक डिवायसच्या माध्यामातून चॅट करतील आणि प्रोफाइल अक्सेस करु शकतील.

व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळे यूजर्स लवकरच फोन कनेक्ट न करता व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकतील. यामुळे आता मोबाईल कनेक्ट करण्याचा ताप राहणार नाही.

व्हाट्सअ‍ॅप लवकरच भारतात आपली पेमेंट सेवा सुरु करु शकते. देशात व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास ४० कोटी यूजर्स आहेत. कंपनी मागील काही महिन्यांपासून १० लाख यूजर्सबरोबर पेमेंट सेवांचे परिक्षण करत आहे. कंपनी पैसे पाठवणे मेसेज पाठवण्यात इतपत सोपं बनवू पाहत आहे. याशिवाय कंपनी इतर देशात देखील ही सेवा देण्याचा विचार करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –