WhatsApp मधील तुमचं ‘ते’ विशिष्ट खासगी चॅट करायचंय सुरक्षित, मग लावा Lock, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सर्वजण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वाधिक वापर करतात. आपले मित्र, कुटूंब किंवा मैत्रिणी बॉयफ्रेंडबरोबर गप्पा मारणेही व्हॉट्सअ‍ॅपवरुन केले जाते. यामध्ये आपण खाजगी गोष्टीही शेअर करतो. पण अशावेळी आपले खासगी चॅट चुकून देखील कुणीही वाचू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. जर एखाद्याने चुकून व्हॉट्सअ‍ॅप उघडले तर आपल्या खाजगी गप्पा कोणी वाचेल अशी भीती सतावत असते. परंतु, आता आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला आता क्लृप्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही भीती कायमची नष्ट होईल. या क्लृप्तीद्वारे तुम्ही कायमचे सुरक्षित होऊन जाल. तुमच्या WhatsApp वरील एखाद्या विशिष्ट चॅटला आता लॉक लावता येणार आहे.

यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, समजून घ्या सोप्या भाषेत
यासाठी WhatsApp Chat Locker या नावाचे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये पासवर्ड टाकून तुम्ही कोणत्याही एका किंवा अधिक लोकांच्या चॅट्सना लॉक करू शकता. हे अ‍ॅप कसे काम करते ते जाणून घ्या. .

एकाच WhatsApp चॅटला लॉक कसे करावे
आधी Google Play Store वरून WhatsApp चॅट लॉकर हे अ‍ॅप डाउनलोड करा. ऍपमध्ये आपल्याला पासवर्ड सेट करण्याचा पर्याय दिला जाईल. आपला आवडता पासवर्ड सेट करा. आता दुसऱ्या पेजच्या तळाशी आपल्याला + चे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवरील Lock Whatsapp Chats वर टॅप करावे लागेल.

आपल्याला पासवर्ड प्रोटेक्शनचा संदेश मिळेल. त्यामध्ये ओके क्लिक करा. आता फोन सेटिंग्जच्या Accessibility पर्यायावर क्लिक करा. पुन्हा ऍपवर जा आणि + आयकॉनवर क्लिक करा आणि Lock Whatsapp Chats टॅप करा. आता आपल्याला एक नवीन संदेश मिळेल. त्याला OK करा. तुम्ही OK करताच तुमचा WhatsApp उघडेल. आता आपण ज्या संपर्कास आपल्या व्हाट्सएपमध्ये लॉक करू इच्छित आहात त्या संपर्कावर टॅप करा. आपणास Conversation लॉकचा संदेश मिळेल. आता आपल्या चॅट्सना लॉक करण्यात आले आहे. जे दुसरे कोणीही उघडू शकणार नाही.

लॉक केेलेल्या चॅट्सना आता अनलॉक करण्यासाठी, ऍपवर जाऊन पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. आपण लॉक केलेल्या चॅटचे नाव दिसेल. आपण त्यावर टॅप करताच आपल्याला एक अनलॉक संदेश मिळेल. त्यावर OK करा. आता OK वर टॅप केल्यास चॅट्स अनलॉक होतील. आता कोणालाही पाहता येऊ शकते.