मोठी बातमी ! ‘या’ मोबाईल फोनमध्ये आपोआप बंद होणार WhatsApp, तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप सर्वात लोकप्रिय मेसेंजर आहे त्यामुळेच आजकाल प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. परंतु व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या युजर्स साठी महत्वाची बातमी आहे. लाखो फोनमध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप आपोआप बंद होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे की, 31 डिसेंबर 2019 नंतर कोणत्याही विंडोज ऑपरेटिंग असलेल्या फोनमध्ये त्यांचे अ‍ॅप चालणार नाही. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.

कधीपासून आणि कोणत्या फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप
iOS7 वर चालणाऱ्या जुन्या कोणत्याही आयफोनमध्ये आणि व्हर्जन 2.3.7 असलेल्या अँड्रॉइड फोनमध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. 1 फेब्रुवारी 2020 नंतर या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. तसेच हे लोक नंतर त्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट देखील क्रिएट करू शकणार नाहीत.

काही फीचर्स काम करणे बंद करणार
व्हॉट्सअ‍ॅप या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी सक्रियतेने काम करत आहे परंतु अशा जुन्या सिस्टिमवल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कधीही बंद पडू शकते किंवा त्याचे काही फीचर्स काम करणे बंद करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप जुन्या फोनमध्ये वारंवार सपोर्ट बंद करत आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅपने 30 जून 2017 ला Nokia Symbian S60 मध्ये आपला सपोर्ट बंद केला आहे.

कंपनीने 31 डिसेंबर 2017 मध्ये ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 साठी सपोर्ट बंद केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने 31 डिसेंबर 2018 पासून नोकिया S40 मध्ये आपला सपोर्ट बंद केला आहे.

यावर उपाय काय ?
व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, आमचे पूर्ण लक्ष पुढील सात वर्षांवर आहे. तसेच अनेक जण वापरत असलेल्या फोनच्या सिस्टीमवर आम्हाला लक्ष द्यायचे आहे असे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे.

त्यामुळे आता जर व्हॉट्सअ‍ॅप वापरात असला तर, आपल्या फोनमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टीम टाका आणि जुन्या फोनचा वापर टाळा.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/