Coronavirus : ‘कोरोना’च्या विरुद्ध लढाईत WhatsApp ची उडी, तयार केलं ‘इनफॉर्मेशन हब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp ने कोरोना व्हायरससाठी एक डेडिकेटेड वेब पेज तयार केले आहे. याला कोरोना व्हायरस इनफॉर्मेशन हबचे नाव दिले आहे. यासाठी डब्ल्यूएचओबरोबर पार्टनरशीप करण्यात आली आहे.

WhatsApp ने या वेबपेजाठी UNICEF आणि UNDP सह या वेबपेजसाठी पार्टनरशीप केली आहे. या कंपनीशिवाय 1 मिलियन डॉलर फॅक्ट चेकिंग नेटवर्कवर खर्च करणार आहे. उद्देश हा आहे की कोरोना व्हायरससंबंधित पसरणाऱ्या अफवांचा निपटारा करता येईल.

WhatsApp ने पॉयंटर इंस्टिट्यूट इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्कला कोरोना व्हायरससंबंधित फेक न्यूजपासून निपटण्यापासून पैसे दिले आहेत. WhatsApp Coronavirus Information Hub ला हेल्थ वर्कर्स, एजुकेटर्स, कम्यूनिटी लीडर्स, सरकार, लोकल बिजनेस आणि एनजीओला लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. याद्वारे कोरोना व्हायरसशीसंबंधित तथ्य आणि मार्गदर्शक तत्व तयार केली जातील.

यात डब्ल्यूएचओकडून देण्यात आलेली माहिती देखील स्त्रोत म्हणून वापरण्यात आली आहे. याशिवाय विविध देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी मार्गदर्शक तत्व देण्यात आले आहेत.

WhatsApp WHO आणि UNICEF सह कोरोना रोखण्यासाठी काम करत आहे. कंपनीचा दावा आहे की इंडोनेशिया, इस्त्राइल, सिंगापूर, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकामधील स्थानिक आरोग्य मंत्रालय आणि एनजीओसह मिळून याप्रकारची माहिती देण्यात आली आहे.

WhatsApp हेड विल कॅथकार्ट म्हणाले, कोरोना पसरल्यानंतर लोक WhatsApp चा जास्त वापर करताना दिसत आहेत. आम्ही सध्या सर्व लोकांना कनेक्ट करण्यासाठी सिंपल रिसोर्स प्रदान करु इच्छित आहेत.

विल कॅथकार्ट म्हणाले, कंपनी अफवांवर लगाम आणण्यासाठी पाॅयंटर इंस्टिट्यूटसोबत पार्टनरशिप केली आहे. जे फॅक्ट चेकिंग ऑर्गनाइजेशन आहेत त्यांना त्यासाठी पैसे देखील दिले जात आहेत.