Fake न्यूज पासून दूर राहण्यासाठी WhatsApp चं खास फिचर ‘लॉन्च’, आता तपास शकता Facts

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपने एक वैशिष्ट्य अपडेट केले आहे, त्यानुसार आता युजर्सला बनावट बातम्यांविषयी माहिती मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त आता युजर्स 70 हून अधिक देशांमधील फॅक्ट चेकर्सशी संपर्क साधू शकतात. फेसबुकच्या मालकीची असलेली कंपनी व्हाट्सअ‍ॅपने पोयन्टर संस्थेच्या इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (आयएफसीएन) सह भागीदारी केली आहे. आयएफसीएनने व्हॉट्सअ‍ॅपवर आपले चॅटबॉट लॉंच केले आहे.

वैशिष्ट्य कसे कार्य करते
चॅटबॉटचा नंबर +1 (727) 2912606 आहे. प्रथम आपल्याला हा नंबर आपल्या कॉन्टॅक्ट यादीमध्ये सेव्ह करावा लागेल. चॅटबॉट सुरू करण्यासाठी ‘हाय’ हा शब्द पाठवा. आयएफसीएनची ही चॅटबॉट आतापर्यंत केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, कंपनी लवकरच ती हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेसह अन्य भाषांमध्ये अपडेट होऊ शकते.

चॅटबॉटच्या मदतीने युजर्स वस्तुस्थिती चेक करु शकतात. तसेच आपण कोरोना विषाणूशी संबंधित बातम्यांविषयी देखील जाणून घेऊ शकता. ही प्रणाली देशाच्या कोडवर आधारित युजर्सला ओळखते. व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्व संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येतात. तसेच, व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही युजर्स याबाबत अधिक माहिती मिळू घेऊ शकतात.