WhatsApp Launches Code Verify | WhatsApp ने लाँच केले Code Verify, कोणीही वाचू शकणार नाही तुमचे चॅट्स; जाणून घ्या कसे वापरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Launches Code Verify | व्हॉट्सअ‍ॅपने नवीन सिक्युरिटी फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी सादर करण्यात आले आहे. कंपनीने याला Code Verify असे नाव दिले आहे. हे एक वेब ब्राऊझर एक्स्टेंशन आहे जे रिअल टाइम, थर्ड पार्टी व्हेरिफिकेशनची सुविधा देते. (WhatsApp Launches Code Verify)

 

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर चालणारा कोड टेम्पर केलेला तर नाही, हे यूजर तपासू शकतात.
व्हॉट्सअ‍ॅपने हे सोप्या भाषेत स्पष्ट केले की व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या सिक्युरिटी अकाऊंटसाठी कोड व्हेरिफाय ट्रॅफिक लाईट सारखे काम करते.

 

Code Verify व्हॉट्सअ‍ॅपने Cloudflare च्या भागीदारीत लाँच केले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोड व्हेरिफाय ओपन सोर्स ठेवण्यात आले आहे जेणेकरून इतर मेसेजिंग सेवा देखील वेबवर मिळणारा कोड व्हेरिफाय करू शकतील.

 

व्हॉट्सअपवर कसे काम करते Code Verify ?

WhatsApp Code Verify Google Chrome, FireFox आणि Microsoft Edge वेब ब्राऊजरवर काम करते.
सर्वप्रथम Code Verify एक्सटेंशन इन्स्टॉल करावे लागेल.
हे इन्स्टॉल होताच Firefox किंवा Edge ब्राऊजरवर ऑटोमेटिकली पिन होते.

 

Google Chrome यूजर्सला ते पिन करावे लागते. जेव्हा एखादा यूजर WhatsApp Web वापरतो तेव्हा तो Code Verify एक्सटेंशन ऑटोमॅटिकली WhatsApp Web वरून रिसिव्ह होणार्‍या कोडला कम्पयेर करतो. (WhatsApp Launches Code Verify)

 

तो हॅश (जो कोडसाठी फिंगरप्रिंट प्रमाणे आहे.) क्रिएट करतो आणि नंतर WhatsApp Web वरून Cloudflare सोबत शेयर होणार्‍या कोडचा हॅश किंवा फिंगरप्रिंटने त्यास मॅच करतो.

 

जर कोड मॅच होऊन व्हॅलिडेट झाला तर यूजरच्या ब्राऊजरवरील Code Verify ग्रीन होते.
जर याचा कलर ऑरेंज झाला तर याचा अर्थ WhatsApp Web व्हेरिफाय होत नाही किंवा पेज रिफ्रेश करण्याची गरज आहे.

 

WhatsApp Web लोड होताना जर कोड व्हेरिफाय आयकॉन रेड झाला तर असे समजले जाऊ शकते की, मिळणार्‍या WhatsApp कोडसोबत सिक्युरिटी इश्यू आहे.
यावर यूजर अ‍ॅक्शन घेऊन व्हॉट्सअपच्या मोबाइल व्हर्जनवर स्विच करू शकतात.
किंवा सोर्स कोड डाऊनलोड करून एखाद्या थर्ड पार्टीला अनालाईज करण्यासाठी देऊ शकतात.

 

Web Title :-  WhatsApp Launches Code Verify | whatsapp launches code verify what it is how it works and more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा