आता व्हॉट्सॲप वरून देखील बिझनेस करता येणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१८ साली व्हॉट्सॲपने युजर्स साठी नवे फीचर्स आणले होते. आता नव्या वर्षासाठी देखील व्हॉट्सॲप पुन्हा भन्नाट फीचर्स घेऊन येणार आहे. यातील काही फीचर्सचे टेस्टिंग सुरु आहे तर काही फीचर्स लवकरच तुमच्या मोबइलपर्यंत येतील.
यातील सर्वात महत्वाचे फिचर व्हॉट्सॲप आणण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत फेसबुक, लींकड इन आशा सोशल नेटवर्किंग साईटस द्वारे बिझनेस देखील वाढवता येतो. पण आता लवकरच व्हॉट्सॲपद्वारे देखील तुम्ही बिझनेस करू शकणार आहात. सध्या या फिचरचे टेस्टींग सुरु आहे. व्हॉट्सॲपद्वारे बिझनेस करणाऱ्या लोकांनी एकापेक्षा अधिक अकाऊंट एकमेकांशी जोडले तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल. अशा लोकांसाठी व्हॉट्सॲप ‘लिंक अकाऊंट’ हे नवे फिचर युजर्सना मिळणार आहे. त्यामुळं आता नवीन वर्षात तुमच्या ग्रुप लिस्टमध्ये बिझनेस ग्रुप देखील ॲड होण्याची शक्यता आहे.
हे आहेत नवे फिचर्स
1. एका वेळी अनेक व्हॉईस मेसेज ऐकू शकतो
सध्या एका वेळी एकच व्हॉईस मेसेज ऐकता येतो, प्रत्येक व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी प्ले करावे लागते. ही समस्या आता सुटेल.
2. स्टिकर्स सर्च करु शकतो
एखाद्या प्रसंगी चॅट करताना हवे ते स्टिकर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे व्हॉट्सॲप स्टिकर सर्चचा नवा ऑप्शन घेऊन येत आहे.
3. व्हॅकेशन मोड, सायलेंड मोड
आपण फिरायला गेलो, सुट्टीवर असू तेव्हा व्हॉट्सॲप मेसेजेसमुळे डिस्टर्ब होतो. अशा वेळी मेसेजेसच्या त्रासापासून सुट्टी मिळवण्यासाठी व्हॅकेशन मोड किंवा सायलेंट मोड हे नवे फिचर दाखल होणार आहे.
4. व्हॉट्सॲप लिंक अकाऊंट
सध्या या फिचरचे टेस्टींग सुरु आहे. व्हॉट्सअॅपद्वारे बिझनेस करणाऱ्यां लोकांनी एकापेक्षा अधिक अकाऊंट एकमेकांशी जोडले तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल. अशा लोकांसाठी व्हॉट्सअॅप लिंक अकाऊंट हे नवे फिचर युजर्सना मिळणार आहे.
5. डार्क मोड
डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूट्यूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज या ॲप्समध्ये आहे. व्हॉट्सॲपही या फिचरची टेस्ट करत आहे.
6. क्यूआर (QR) कोडच्या मदतीने शेअरींग
क्यूआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट्स किंवा फाईल्स शेअर करता येतील.
7. मल्टी शेअर फाईल्स
या फिचरच्या मदतीने एकावेळी पीडीएफ, ऑडिओ आणि एकापेक्षा अधिक कॉन्टॅक्ट्स शेअर करता येतील.
8. मेसेज प्रीव्ह्यू
मेसेज सेंड केल्यानंतर कसा दिसेल हे मेसेज सेंड करण्यापूर्वी पाहता येईल. त्यासाठी मेसेज प्रीव्ह्यू हे फिचर वापरता येईल.
9. नोटीफिकेशनमध्ये व्हिडीओ पाहा
व्हॉट्सॲपवर आलेला व्हिडीओ मोबाईलच्या नोटीफिकेशनमध्ये पाहता येऊ शकतो. या फिचरच्या मदतीमुळे आपण व्हिडीओ पाहिला असला तरी आपण तो व्हिडीओ पाहिला आहे, ही गोष्ट मेसेज पाठवणाऱ्याला समजणार नाही.