WhatsApp Loan | व्हॉट्सअपवर 10 मिनिटात मिळेल 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : WhatsApp Loan | आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance) कंपनी 10 मिनिटात व्हॉट्सअपद्वारे 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन ऑफर करत आहे (business loan of Rs 10 lakh through WhatsApp in 10 minutes). ही माहिती सोमवारी आयआयएफएल फायनान्सने दिली. अखेर हे कर्ज कसे घ्यावे ते जाणून घेवूयात…

व्हॉट्सअपवर करू शकता अर्ज

कर्जासाठी WhatsApp वरून 9019702184 वर Hi चा एक टेक्स्ट पाठवा. बेसिक डिटेल आणि लोन रिक्वायरमेंटची माहिती द्यावी लागेल. यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर लोन अप्रूव्हल दिले जाईल.

लोन अप्रूव्हल आल्यानंतर अकाऊंटमध्ये पैसे मिळवण्यासाठी, केवायसी प्रोसेसमधून जावे लागेल. बँक ट्रान्सफर माहिती आणि अनिवार्य रजिस्ट्रेशन, सर्व मेसेजिंग अ‍ॅपवर व्हेरिफाय होईल. (WhatsApp Loan)

काही मिनिटातच अप्रूव्हल

आयआयएफएलने म्हटले आहे की, ग्राहक मिनिमम डॉक्युमेंट आणि अप्रूव्हलसह काही मिनिटातच 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्राप्त करू शकतात.
आयआयएफएलने फीचर रोल आऊट करण्यासाठी फिनटेक फर्म सेतु (fintech firm Setu) सोबत भागीदारी केली आहे.

Pune News | पुण्यातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे धनराज राठी यांचे निधन

काय म्हणत आहेत कंपन्या

आयआयएफएल फायनान्सचे चीफ रिस्क ऑफिसर संजीव श्रीवास्तव (Sanjeev Srivastava, Chief Risk Officer, IIFL Finance) यांनी म्हटले की, ही घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे की, पहिल्यांदा एक छोटा व्यापारी WhatsApp चॅटिंगच्या माध्यमातून डिस्कव्हर करू शकतो, औपचारिकता पूर्ण करू शकतो.
भारतात व्हॉट्असपचे 450 मिलियनपेक्षा जास्त यूजर्स आहेत.

सेतुचे को-फाऊंडर आणि सीईओ साहिल किनी (Sahil Kini, Co-Founder and CEO of Setu) म्हणाले, आमचा प्रयत्न WhatsApp वर 100 टक्के डिजिटल लोन ट्रॅव्हलसह भारतात दर एमएसएमईसाठी व्यावसायिक कर्ज सोपे बनवणे आहे.
त्यांनी म्हटले की, आम्ही एमएसएमई लोन इंडस्ट्रीमध्ये आमच्या पहिल्या उपक्रमासाठी आयआयएफएल फायनान्ससह भागीदारी करून आनंदी आहोत, जिथे 100 टक्के कर्जाचा अर्ज ते वितरणापर्यंत डिजिटल प्रकारे होते.

या गोष्टी आवश्य लक्षात ठेवा

– फिनटेक कंपनीच्या ऑथेंटिकेशनकडे लक्ष द्या. त्यांचा कोणत्या एनबीएफसीसोबत करार आहे ते पहा.

–  जर कुणी डिजिटल प्लॅटफ़ॉर्म केवायसीच्या शिवाय कर्ज देत असेल तर हे अयोग्य आहे.

– अनावश्यक हिडन चार्जेस जाणून घ्या, व्याज लावण्याची पद्धत जाणून घ्या.

– ऑफर डॉक्युमेंट्स पूर्ण वाचा, यामध्ये कालावधी, व्याजदर आणि तुमचे कर्जधोरण, नियम आणि अटींचा समावेश असतो.
फसवणूक, अनावश्यक समस्या आणि शुल्कांपासून सुरक्षित राहण्याची ही चांगली पद्धत आहे.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोने-चांदी आज किती झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर

WhatsApp वर अमूलकडून 6000 रुपये कमावण्याचा मेसेज आला तर व्हा Alert, रिकामे होईल बँक अकाऊंट

Mumbai Anti Corruption | सहायक वनसरंक्षक अधिकारी 5.30 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; कार्यालयातच सापडलं मोठं ‘घबाड’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Whatsapp Loan | business loan of rs 10 lakh will be available in 10 minutes on whatsapp know whole process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update