एकाच ‘नंबर’ वरुन एकाच वेळी अनेक ‘स्मार्टफोन’ वर वापरता येणार ‘WhatsApp’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp लवकरच यूजर्स मल्टिपल डिवाइस सपोर्ट देणार अशी शक्यता आहे. WABetainfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की कंपनी याची टेस्टिंग करत आहे. या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की WhatsApp Beta वर्जन 2.19.120.20 मध्ये WhatsApp मल्टी प्लॅटफॉर्म सपोर्ट पाहिला गेला आहे.

या नव्या मल्टी प्लॅटफॉर्म फिचरमध्ये वेगवेगळ्या डिवाइसवर एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट लॉन इन करण्याचे फिचर मिळेल. सध्या एक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट फक्त एकाच स्मार्टफोनवर यूज करु शकत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप वेब अजूनही आहे ज्याला मोबाइलबरोबरच यूज करु शकतात.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार या बीटा वर्जनमध्ये एक रजिस्ट्रेशन किंवा वेरिफिकेशन कोड हा पर्याय पाहण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या एखाद्या डिवाइसने व्हॉट्सअ‍ॅप लॉन इन करण्याचा प्रयत्न कराल त्या तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा वेरिफिकेशन कोड मागितला जाईल. या प्रकारचे रजिस्ट्रेशन आणि वेरिफिकेशन तेव्हाच मिळेल जेव्हा यूजर एकाच वेळी एकापेक्षा जास्त डिवाइसवर लॉन इन करेल.

सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या या पॉलिसीमध्ये ज्यात एक अकाऊंट एकावेळी फक्त एकच फोनमध्ये यूज केले जाऊ शकेल हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे होते, कारण असे असल्याने हॅकिंगचा धोका कमी होता. त्यामुळे आता हे नवे फीचर कंपनी आणत असेल तर त्यांची पहिल्यांदा कंपनीकडून टेस्टिंग प्रक्रिया करण्यात येईल.

WhatsApp चे मल्टिपल डिवाइस सपोर्टसारखेच डार्क मोड असेच एक फीचर आहे ज्याची यूजर बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. परंतू आतापर्यंत कंपनीने डार्क मोडसंबंधित कोणतीही माहिती दिली नाही, परंतू वेळोवेळी यासंबंधित माहिती येत आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट आता लीक होत आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like