खुशखबर ! आता एकापेक्षाही जास्त स्मार्टफोनमध्ये वापरता येणार WhatsApp, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp आतापर्यंत एका नंबरवरून एकाच वेळी एकाच मोबाईलवरून वापरणे शक्य होते. म्हणजेच एक वॉटसअ‍ॅप अकाउंट एकापेक्षा जास्त मोबाईल फोनमध्ये वापरता येत नव्हते पण आता हे शक्य होणार आहे. एका अहवालानुसार ‘इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप’ व्हाट्सअ‍ॅप Universal Windows Platform वर काम करत आहे. याचा उद्देश व्हाट्सअ‍ॅपला मल्टिप्लॅटफॉर्मसाठी निर्माण करणे हा आहे.

WABetainfo च्या एका अहवालानुसार हे फिचर अ‍ॅँड्रॉइड आणि iOS दोन्हींसाठी लागू होऊ शकते. पण आता व्हाट्सअ‍ॅप Universal Windows Platform वर काम करत आहे. याचे उपयोजन व्हाट्सअ‍ॅपमध्ये केली जाईल. व्हाट्सअ‍ॅपकडून एक अशी सिस्टीम तयार करण्यात ज्या सिस्टीमच्या माध्यमातून व्हाट्सअ‍ॅप एकापेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये वापरता येऊ शकते.

या अहवालात म्हटले आहे की, व्हाट्सअ‍ॅपकडून UWP ची टेस्टिंग केली जात आहे. म्हणजेच टेस्टिंग झाल्यानंतर ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली जाईल. डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगनंतर हे फिचर युजर्सपर्यंत आल्यानंतर व्हाट्सअ‍ॅप वापरण्याचा वेगळाच अनुभव युजर्सना मिळेल.

अहवालानुसार या फीचरनुसार युजरला एकच व्हाट्सअ‍ॅप अकाउंट अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये युज करता येईल. म्हणजेच तुम्ही जर आयफोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप युज करत असाल तर तुम्हाला तुमच्याजवळ असणाऱ्या अँड्रॉइड फोनवर देखील व्हाट्सअ‍ॅप वापरता येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त