WhatsApp मध्ये लवकरच येणार मोस्ट अवेटेड मल्टी-डिवाइस सपोर्ट फीचर

पोलिसनामा ऑनलाइन – व्हॉट्सअ‍ॅप काही काळ त्याच्या प्लॅटफॉर्मवर मल्टी-डिव्हाइस सपोर्ट देण्यासाठी कार्यरत आहे. वर्षभर या आगामी वैशिष्ट्याबद्दल अहवाल येत आहेत. आता एका नवीन अहवालात या वैशिष्ट्याबद्दल काही अधिक माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेवलपमेंटच्या ट्रैक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo च्या एक रिपोर्ट नुसार फेसबुकच्या मालकीचे हे अ‍ॅप अपकमिंग फीचर ऑन केल्यानंतर कॉल्स कसे कंफीगर होतील याची चाचणी करीत आहेत.

गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअ‍ॅप वेगवेगळ्या डिवाइसेजमध्ये सेम अकाउंटसाठी कॉल्स कसे कार्य करेल याची तपासणी करीत आहे. यावरून दिसून येते की कंपनी या वैशिष्ट्याबद्दल गंभीरपणे काम करीत आहे आणि लवकरच आपण हे वैशिष्ट्य पाहू शकतो.टिपस्टरने या फीचरच्या रीलिझ तारखेविषयी काहीही सांगितले नाही.

जुन्या अहवालातही या वैशिष्ट्याचा उल्लेख होता. एका अहवालात सांगितले गेले होते की या वैशिष्ट्याद्वारे वापरकर्ते एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर समान अकाउंट चालवण्यास सक्षम असतील. तसेच व्हॉट्सअ‍ॅप वेबप्रमाणेच मुख्य डिव्हाइसवर एक्टिव इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक नसेल.जुन्या अहवालांमध्ये हे देखील सांगण्यात आले होते की मल्टी-डिवाइस सपोर्ट अ‍ॅपमधील लिंक्ड डिवाइसेज सेक्शन त्याच्यामध्ये उपलब्ध असेल.