WhatsApp मध्ये मोठी समस्या, तुमचा डेटा सुरक्षित नाही ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअ‍ॅप हे एंड टु एंड एन्क्रिप्शन वर काम करत असते. जे जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. फक्त व्हाट्सअ‍ॅपच नाही तर टेलिग्राम देखील एंड टु एंड एन्क्रिप्शन वर काम करते. मात्र तरीदेखील तुमच्या मीडिया फाईल्स सुरक्षित नाहीत. Symantec एक साइबर सिक्योरिटी फर्म असून त्यांनी हॅकर्स कशाप्रकारे एक अ‍ॅप वापरून तुमचा डेटा हॅक करू शकतात याची माहिती दिली आहे. हे अ‍ॅप वापरून ते तुमच्या मीडिया फाईल्समध्ये छेडछाड करू शकतात आणि त्याचा गैरवापर देखील करू शकतात.

अँड्रॉइड मोबाईलवरील अ‍ॅप सर्व मीडिया फाइल्स, फोटो आणि ऑडियो फाइल्स सेव्ह करण्यासाठी इंटर्नल आणि एक्स्टर्नल मेमरीचा वापर करत असतात. व्हाट्सअ‍ॅपच्या बाबतीत सांगायचे झाले तर बाय डिफॉल्ट सर्व मीडिया फाइल्स, फोटो आणि ऑडियो फाइल्स सेव्ह करण्यासाठी एक्स्टर्नल मेमरीचा वापर होतो. याचबरोबर टेलिग्रामदेखील देखील अशाच पद्दतीने मीडिया फाइल्स, फोटो आणि ऑडियो फाइल्स सेव्ह करण्यासाठी एक्स्टर्नल मेमरीचा वापर करते. यामुळेच व्हाट्सअप आणि टेलिग्रामच्या एक्स्टर्नल स्टोरेज म्हणजेच मेमरी कार्डमध्ये व्हायरस सोडून तुमचा डेटा चोरी केला जाऊ शकतो.

उदाहरण द्यायचे झाल्यास समजा तुम्हाला कुणी एखादा फोटो पाठवला असेल तर या अ‍ॅपच्या मदतीने हॅकर तुमच्या त्या फोटोमध्ये सहज तुम्हाला काहीही कळू न देता बदल करू शकतो. त्याचबरोबर हॅकर तुम्हाला पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये देखील हेराफेरी करू शकतो.

दरम्यान, या पद्धतीला ‘फाईल जॅकिंग’ असे म्हणत असून यामध्ये असे व्हायरस अटॅक दुसऱ्या अ‍ॅपवर देखील करण्यात येत असून एक्स्टर्नल स्टोरेज वर अटॅक करून तुमचा डेटा चोरी केला जाऊ शकतो. यासंदर्भात व्हाट्सअ‍ॅपने एक परिपत्रक जारी केले असून तुम्ही तुमचे स्टोरेज ऑप्शन बदलून यापासून बचाव करू शकता असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा