WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – WhatsApp Messages | 2021 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या 1 जानेवारी 2022 नवं वर्ष सुरू होतेय. या पार्श्वभूमीवर सर्वजण आपल्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक अशा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. नववर्षाच्या शुभेच्छाचा वर्षाव अनेकजण प्रत्यक्ष भेटून देत असतात. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वाधिक शुभेच्छा देणे अनेकजण पसंत करतात. खरंतर व्हॉट्सअ‍ॅप संदेश (WhatsApp Messages) च्या द्वारे नववर्षाच्या शुभेच्छा देताहेत. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी 5 जणांनाच मेसेज सेन्ड करता येतो. या अडचणीत अनेकांना मेसेज (Messages) पाठवण्यासाठी अधिक वेळ लागतो. पण एकाच वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर एक योग्य मार्ग आहे.

 

एकाच वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची आवश्यकता नाही. आता एका सोप्या मार्गाने एकाच वेळी 250 लोकांना मेसेज पाठवता येणार आहे. यासाठी WhatsApp वर सर्वात सोपा मार्ग अर्थात ब्रॉडकास्ट लिस्ट (Broadcast list) तयार करणे. या सहाय्याने आता तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवू शकणार आहे. यात संपर्क क्रमांक सिलेक्ट करण्याची आवश्यकता नसणार आहे. (WhatsApp Messages)

दरम्यान, WhatsApp वर ब्रॉडकास्ट लिस्ट (Broadcast list) तयार करण्यासाठी तुम्हाला WhatsApp सुरू करुन
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या 3 व्हर्टिकल डॉट मेनूवर क्लिक करावे लागणार आहे.
यामध्ये आता वापरकर्तेला ज्याला संदेश पाठवायचा आहे तो कॉन्टॅक्ट्स निवडा.
अशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ब्रॉडकास्ट सूची ओपन करा आणि तुमचा मेसेज टाइप करून पाठवुन द्या.
हा मार्ग निवडल्यानंतर तुम्ही पाठवलेला मेसेज तुम्ही कनेक्ट केलेल्या संपर्कातील माणसापर्यंत पोहचेल.

 

 

Web Title :- WhatsApp Messages | send new year greeting to your friend on whatsapp without making any group on it know the tips and tricks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

 

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

 

Maharashtra Lockdown | ‘राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’ – विजय वडेट्टीवार

 

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

 

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या मोठ्या कमतरतेचे संकेत आहेत ‘ही’ 5 लक्षणे, बहुतांश लोक करतात दुर्लक्ष