Whatsapp Multi Device Support Feature | व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘त्या’ फीचरची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Whatsapp Multi Device Support Feature | WhatsApp यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. ज्या फीचरची यूजर्स मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होते ते फीचर कंपनीने रोलआऊट केले आहे. कंपनीने नॉन-बीटा यूजर्ससाठी सुद्धा Multi-Device Support फीचर रोलआऊट करण्यास सुरू केले आहे, जे अजूनपर्यंत केवळ बीटा यूजर्सला मिळत होते. या अतिशय खास फीचरद्वारे यूजर्स एकाचवेळी एकापेक्षा जास्त डिव्हाईस जसे लॅपटॉप आणि कम्प्यूटरवर आपले WhatsApp अकाऊंट चालवू शकतात. (Whatsapp Multi Device Support Feature)

अ‍ॅप करावे लागेल डाऊनलोड
WhatsApp ट्रॅकर WABetaInfo नुसार अ‍ॅपचे व्हर्जन 2.21.19.9 वर अँड्रॉईड आणि iOS यूजर्ससाठी रोलआऊट केले आहे. तुम्ही अ‍ॅप नवीन व्हर्जनने अपडेट करून व्हॉट्सअप मल्टी-डिव्हाईस सपोर्ट फीचरचा वापर करू शकता. रिपोर्टनुसार WhatsApp भविष्यातील अपडेट्ससाठी मल्टी-डिव्हाईस व्हर्जन अपडेटला मँडेटरी करूशकते.

विना इंटरनेट सुद्धा चालणार
WhatsApp ने हे खास मल्टी-डिव्हाईस फीचर जुलैमध्ये सादर केले होते. याचे वैशिष्ट्य हे आहे की जर यूजरच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल तरी सुद्धा WhatsApp अकाऊंट चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर चालवता येऊ शकते. तसेच जर यूजरचा फोन बंद झाला तरी सुद्धा लॅपटॉप किंवा पीसीमध्ये WhatsApp सुरूच राहील.

असे अ‍ॅक्टिव्हेट करा WhatsApp मल्टी-डिव्हाईस सपोर्ट फीचर
प्रथम स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप ओपन करा.

आता वर दिलेल्या तीन डॉट मेन्यूवर जा.

येथे लिंक्ड डिव्हाईस ऑपशनवर क्लिक टॅप करा.

इतके केल्यानंतर आता मल्टी-डिव्हाईस बीटा ऑपशनवर टॅप करा.

येथे तुमच्याकडे बीटा जॉईन किंवा लीव करण्याचे ऑपशन असेल.

Web Titel :- whatsapp multi device support feature rolled out know how it will work on android

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money laundering Case | सचिन वाझेचा खुलासा – ‘शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले होते’

Ahmednagar Crime | धक्कादायक ! 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून अत्याचार

PAK vs NZ | PM इम्रान खान सुद्धा वाचवू शकले नाहीत पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट सीरीज, सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या क्षणी रद्द