WhatsApp चं नवं फिचर लवकरच ‘रोलआउट’ होणार, एकाच नंबरवरून अनेक ‘डिव्हाइस’वर वापरता येणार, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. व्हॉट्सअॅपचे भारतात जवळपास २० कोटींपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. म्हणून व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या फीचर्समध्ये बदल करत असते. आता कंपनी दोन शानदार फीचर्स घेऊन येणार आहे. एकच व्हॉट्सअॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता यावं यासाठी WhatsApp अनेक दिवसांपासून काम करत आहे. पण आता लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउट करण्याची शक्यता आहे. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक डिव्हाइसवर WhatsApp अकाउंटचा वापर करता येणार आहे.
WABetaInfo वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपने एन नवीन अँड्रॉइड बीटा अपडेट जारी केलं आहे. Android साठी या लेटेस्ट व्हॉट्सअॅप v2.20.196.8 अपडेटमध्ये दोन नवीन फीचर्स आहेत. यात अॅडव्हान्स सर्च मोड आणि मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट यांचा समावेश आहे. या माध्यमातून एक व्हॉट्सअॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येईल, अशा मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट या फीचरवर कंपनी अनेक दिवसांपासून काम करत आहे.
व्हॉट्सअॅपने मल्टिपल डिव्हाइस सपोर्टसाठी ‘‘Linked Device’ नावाचं एक वेगळं सेक्शन देण्यात आलं आहे. हे सेक्शन व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये दिलं गेलं आहे. या फीचर्सच्या अपडेटमुळे एकाच व्हॉट्सअॅप अकाउंटचा वापर अनेक डिव्हाइसवर करता येणार आहे. सध्या हे फिचर केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. मात्र, लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउट केलं जाण्याची शक्यता आहे.
कंपनी सध्या या फिचर वर काम करत आहे. हे फिचर अपडेट केवळ बीटा मध्ये आलं आहे. पण बीटा वापरकर्त्यांना टेस्टिंगसाठी अद्याप हे फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं नाही. त्यामुळे बीटा अपडेट डाउनलोड केल्यानंतर सुद्धा वापरकर्त्यांना हे फिचर दिसणार नाही. टेस्टिंग पूर्ण केल्यानंतर हे फिचर सर्व वापरकर्त्यांना उपलब्ध केलं जाणार असल्याची शक्यता आहे.