नवी दिल्ली, वृत्तसंस्था – फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन गायब झाल्याचे दिसत आहे अशी तक्रार काही वापरकर्त्यांनी शुक्रवारी केली. वापरकर्ते आता तक्रार करत आहेत की फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट चॅट मेसेंजर अॅप प्ले स्टोअर शोधले की सर्चमध्ये दिसत नाही.
याचा अर्थ असा की ज्यांना नव्याने व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर सामील तर ते आता तसे करु शकत नाहीत. यामुळे यूजर गुगल प्ले स्टोअरद्वारे व्हॉट्सअॅप मोबाइलमध्ये इंस्टॉल करु शकणार नाहीत.
जर, तुम्ही याआधी व्हॉट्सअॅप स्थापित केले असेल परंतू काही कारणास्तव तुम्ही ते अनइंस्टॉल केले असेल तर तुम्हाला Google प्ले स्टोअरमधील आधी इंस्टाल केले असल्याने तुम्ही ते पुन्हा इंस्टाल करुन शकाल. याचा अर्थ असा होतो की व्हॉट्सएप गूगल प्ले स्टोअरवरून पूर्णपणे नाहीसे झाले आणि गूगलने अॅपला ब्लॅकलिस्ट देखील केले नाही, असे अहवालात म्हटले आहे.
परंतू असे झाल्याचे कारण अस्पष्ट आहे, असे असले तरी व्हॉट्सएप फॉर बिझनेस अद्याप ही प्ले स्टोअरवर आहे, असे व्हॉट्सअॅप अपडेट्सची माहिती देणाऱ्या फॅन वेबसाइट डब्ल्यूएबीटाइंफोने शोधली.
Visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम