WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, झाले ‘हे’ बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी लागोपाठ नवीन फीचर आणत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार अशी माहिती समोर आली आहे की, अँड्रॉयड बीटा ॲपमध्ये नवीन स्टिकर पॅक दिसले आहे. तसेच वॉलपेपर्समध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. व्हॉट्सॲपमध्ये प्रत्येक चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर लावण्याच्या फीचरवर सध्या काम सुरु आहे. या फीचरला WhatsApp Dimming असे नाव देण्यात येणार आहे.

WABetalnfo ने व्हॉट्सॲपचे लेटेस्ट बीटा अँड्रॉयड व्हर्जन 2.20.200.6 मध्ये नवीन स्टीकर पॅक दिसले आहे. या स्टिकर पॅकला ॲपमध्ये दिलेली डिफॉल्ट स्टिकर लिस्टमध्ये ॲड करण्यात आले आहे. नवीन स्टीकर पॅकचे नाव Usagyuuun आहे आणि याला Quan lnc नावाच्या कंपनीने तयार केले आहे. हे एक ॲनिमेटेड स्टिकर पॅक आहे. यापूर्वी बीटा ॲपमध्ये ॲनिमेटेड स्टिकर पॅक फीचर पाहिले गेले होते. या पॅकमध्ये व्हाईट कलरचे कार्टून आहे जे joy, anxiety, sadness, love यासारख्या फीलिंग्स सोबत येते.

स्टिकर पॅकची साईज 3.5 MB लिस्ट करण्यात आली आहे. सध्या लेटेस्ट बीटा पॅकमध्ये इनेबल असून याचा वापर करता येणार आहे. याशिवाय रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, व्हॉट्सॲप 2.20.200.6 बीटा अँड्रॉयडमध्ये एक नवीन वॉलपेपर डिमिंग फीचर आले आहे. हे युजर प्रीफरेंससाठी तुमच्या हिशोबाप्रमाणे कलर बदलतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन वॉलपेपर सेक्शनमध्ये ॲड केले जाणार असून यावर काम सुरु आहे. WABetalnfo ने एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यात Wallpaper Dimming टॅगलला स्क्रीन वर खालच्या बाजूला पाहिले जाऊ शकते.

टॅगलला लेफ्ट किंवा राईटच्या बाजुला स्वाईफ करण्याने वॉलपेपरचा रंग बदलला जाईल. युजर आपल्या डोळ्यांच्या सुविधेनुसार कलर चेंज करु शकेल. WABetalnfo च्या माहितीनुसार या फीचरवर अद्याप काम सुरु आहे. हे भविष्यात येणाऱ्या अपडेसोबत उपलब्ध होईल.