आता ‘WhatsApp’ स्टेटसला ‘Facebook’वर शेअर करता येणार, आलं नवीन फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच प्रतिक्षेनंतर फेसबुक स्टोरीवर स्टेट्स अपडेटचे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत हे फीचर टेस्टिंगसाठी होते आणि व्हॉट्सअ‍ॅप आता याचे अपडेट देण्यास सुरुवात केली आहे. हे लेटेस्ट वर्जनअ‍ॅण्ड्राइड आणि आयफोन दोन्हीसाठी असेल. सध्या हे वर्जन बीटासाठी देण्यात आले आहे. परंतू लवकरच हे फीचर सर्वांना उपलब्ध होईल.

या फिचरच्या मदतीने यूजर्स व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला फेसबुक स्टोरीवर शेअर करु शकतील. यासाठी शेअर टू फेसबूक हा पर्याय निवडावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅप प्रवक्तांनी या बाबतची महिती दिली. जर तुम्ही स्टेट्स अपडेट शेअर करता तर याचा कंटेंट इतर अ‍ॅपवर देखील शेअर करता येईल. परंतू स्टेट्स अपडेट शेअर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या खात्याची माहिती फेसबूक किंवा इतर अ‍ॅपला शेअर करणार नाही.

एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅण्ड्राइट वर्जन 2.19.258 आणि आयओएस वर्जन 2.19.92 वर उपलब्ध आहे. दोन्ही वर्जन डाऊनलोड केले जाऊ शकतात.

या नव्या वर्जनमधून तुम्ही ना की फक्त तुमचे स्टेट्स फेसबूकवर शेअर करता येईल तर इतर अ‍ॅपवर देखील तुम्ही स्टेट्स शेअर करु शकतात.यासाठी फेसबूक स्टोरीच्या बाजूला शेअर बटन असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने एफएफ्यूमध्ये हे फीचर सुरु झाल्याची माहिती देण्यात आली. परंतू अनेक यूजर्सपर्यंत हे अपडेट अजून उपलब्ध करुन देण्यात आले नाही.