WhatsApp वर बिनकामाचे मॅसेज करणार्‍यांचा होणार बंदोबस्त, लॉंच होतंय नवीन फीचर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात प्रसिद्ध मॅसिजिंग अ‍ॅप (Whatsapp) ने यूजर्ससाठी बरीच नवीन फीचर्स लाँच केली आहेत. आता ओव्हरऑल यूजर्संच्या (Whatsapp) वापराचा अनुभव चांगला करण्यासाठी (Archived Chats) चा नवीन वर्जन (Read Later) या नावाने नवीन फीचर येत आहे. या फीचरचा यूजर्संना मोठा फायदा होणार आहे.

(Whatsapp) मध्ये येत असलेले (Read Later) ऑप्शन काय आहे, त्याचा कसा फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती लवकरच समजणार आहे. यूजर्स काही मोजक्या कॉन्टॅक्टला (Read Later) ऑप्शन सिलेक्ट करू शकतील. सध्या (Whatsapp) वर फेसबुकची मालकी आहे. (Read Later) फीचरच्या साहाय्याने यूजर्स काही चॅटना वाटेल तेेव्हा (mute) करू शकतील. रिपोर्टच्या माहितीनुसार हे फीचर बऱ्याच अंशी (Vacation Mode) सारखे काम करणार आहे. ज्यावर कंपनी बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. सध्याचा (Archived Chat) ऑप्शन आणि या नव्या फीचरमध्ये मोठा फरक असून (Read Later) मध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर नवीन मेसेजचे नोटिफिकेशन येणार नाही, तर दुसऱ्या बाजूला चॅट आर्काइव्ह केल्यावर नवीन मॅसेज आल्यावर त्याचे नोटीफिकेशन येते.

कसे काम करेल (Read Later)
जर तुम्हाला एखाद्याचे मॅसेज वाचायचे नसतील आणि चॅटिंगही करायची नसेल, तर तुम्हाला तो नंबर (Read Later) मध्ये अ‍ॅड करावा लागेल. त्यानंतर त्या नंबरची कसलीही नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही. या नवीन फीचरमुळे यूजर्संना अनावश्यक मॅसेज टाळता येणार आहेत. (Read Later) हा ऑप्शन यूजर्स कधीही इनेबल आणि डिसेबल करता येणार आहे.