‘WhatsApp’चं नवं ‘फिचर’ एकदम फायद्याचं ! Audio मधील विषय समजणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp मध्ये नवे फिचर आता लॉन्च होत आहे. अनेकदा कंपनी नवनव्या फिचर्सचे टेस्टिंग करत असते परंतू त्यातील अनेक फिचर कंपनी लॉन्च करत नाही. परंतू कंपनी नवे फिचर लॉन्च करत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल.

WhatApp ऑडिओ मेसेज संबंधित मागील काही दिवसापासून इंप्रुव करण्याचे काम करत आहे. कंपनीने सुरुवातीपासूनच या फिचरमध्ये खूप बदल करत आहे. आणि आता त्याचे नवे फिचर देखील आले आहे.

नव्या फिचरमध्ये ऑडिओ मेसेजला नोटिफिकेशनच्या माध्यमातूनच ऐकू शकतात. हे प्रिव्यूसाठी करण्यात आले आहे. जेणे करुन यूजर्सला अंदाज येईल की ऑडिओ मेसेज कशाशी संबंधित आहे.

ऑडिओ प्लेबॅक फिचरमध्ये हा फायदा होईल की यूजर्स डायरेक्ट नोटिफिकेशन पॅनलमधून ऑडिओ मेसेज ऐकू शकतील. या फिचरला आतापासून यूज करण्यासाठी तुमच्याकडे test fight whatsapp 2.19.91.1 हे वर्जन असणे आवश्यक आहे.

WAbetainfo नुसार सध्या काही यूजर्सला हे फिचर वापरण्यास दिले आहे. परंतू जास्तीत जास्त यूजर्स पर्यंत हे फिचर पुरवण्यात येईल. यात काही इंप्रूवमेट अजून सुरु आहे.

या आधी प्रत्येक ऑडिओ मेसेज एक एक प्ले करावा लागत होता. आता एका बीप नंतर दूसरा आणि तिसरा ऑडिओ मेसेज प्ले होईल. याचा फायदा हा होईल की जर ऑडिओ मेसेज ऐकण्यासाठी कानाला मोबाइल लावला असेल तर वेगवेगळे ऑडिओ फाइल तुम्हाला ऐकता येतील.