×
Homeटेक्नोलाॅजीWhatsApp New Feature | नववर्षाच्या सुरूवातीलाच व्हाट्सऍपकडून यूजर्सना खास गिफ्ट

WhatsApp New Feature | नववर्षाच्या सुरूवातीलाच व्हाट्सऍपकडून यूजर्सना खास गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सऍपकडून (WhatsApp New Feature) युजर्सला नेहमी नवनवीन फीचर्स देवून आकर्षित करण्यात येते. असेच एक भन्नाट फीचर व्हाट्सऍपवर आले आहे. त्याचा फायदा करोडो यूजर्सना घेता येणार आहे. व्हाट्सऍपकडून जगभरातील युजर्ससाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला असल्याची माहिती व्हाट्सऍपकडून गुरूवारी जाहीर करण्यात आली. प्रॉक्सी सपोर्टमुळे जगभरातील व्हाट्सऍप युजर्स इंटरनेटशिवाय या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकतील. केवळ त्यांच्या फोनवरच नाही तर, त्यांच्या परिसरात इंटरनेट नसले तरीही युजर्स व्हाट्सऍप सेवा वापरू शकणार आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये व्हाट्सऍपच्या (WhatsApp New Feature) या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

युजर्स या फीचरच्या (WhatsApp New Feature) मदतीने जगभरातील वॉलींटियर्स आणि ऑर्गनायझेशनच्या प्रॉक्सी सर्वर सेटअपद्वारे एकमेकांशी कनेक्ट राहण्यास सक्षम असतील. व्हाट्सऍपने सांगितले आहे की या प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही, युजर्सना गोपनियता आणि सुरक्षिततेची काळजी करण्याची गरज नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. तसेच त्यांचे मेसेजेस एंड-टू-एंड एनक्रिप्टेड देखील असतील.

 

कंपनीच्या (WhatsApp New Feature) दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान यूजर्सचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ना प्रॉक्सी नेटवर्कवर, ना मेटा किंवा स्वतः WhatsApp. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंटरनेट बंद कधीच होऊ नये, या २०२३ वर्षासाठीच्या आमच्या शुभेच्छा.’

तसेच व्हाटस्अॅपने(WhatsApp New Feature) असेही लिहिले की, ‘गेल्या काही महिन्यांपासून इराणमधील समस्या आपण पाहत आहोत, शेवटी ते मानवाधिकार नाकारतात आणि लोकांना तातडीने मदत मिळण्यापासून रोखतात. असे शटडाउन्स होत राहतील. आम्हाला आशा आहे की, हा उपाय लोकांना मदत करेल, जिथे सुरक्षित आणि विश्वासार्ह-संवादाची गरज आहे. त्यासंबंधीचे ट्वीट व्हाटस्अॅपने केले आहे.

 

यासंबंधीचा (WhatsApp New Feature) पर्याय तुम्हाला व्हाटस्अॅपच्या सेटिंग्ज मेनूमध्ये आढळेल.
त्यासाठी तुमच्या फोनवर WhatsApp चे नवीन व्हर्जन असणे आवश्यक आहे.
कंपनीचे असे म्हणणे आहे की, जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर,
तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर विश्वासार्ह प्रॉक्सी सोर्स शोधू शकता.
प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल.

 

अशा प्रकारे (WhatsApp New Feature) तुम्ही हे नेटवर्क नंतर वापरू शकाल.
कनेक्शन यशस्वी झाल्यास, तुम्हाला चेकमार्क दिसेल.
काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही मेसेज पाठवू शकत नसाल,
तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशात,
तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल. कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत नेटकऱ्यांनी केले आहे.

 

Web Title :- WhatsApp New Feature | whatsapp adds proxy supports users can use app without internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | ‘भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हत’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)

Must Read
Related News