होय ! WhatsApp कॉलही करता येणार रेकॉर्ड, ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   तुमचं एखादं महत्त्वाचं संभाषण तुम्हाला परत ऐकायचं आहे. पण ते संभाषण व्हॉट्सअ‍ॅपने कॉल करून झाल्यामुळे तुम्हाला ऐकायला मिळत नाही. अशी वेळ पुन्हा येणार नाही. कारण आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलही रेकॉर्ड करणं सहज शक्य होणार आहे. अँड्रॉईड आणि आयफोन युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड शक्य आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करताना ज्या व्यक्तीचा कॉल तुम्ही रेकॉर्ड करत आहेत. त्याला याची पूर्व कल्पना देणं आवश्यक आहे.

अँड्रॉईल युझर्ससाठी कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत

जर तुम्ही अ‍ॅड्रॉईड युझर्स असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर क्यूब कॉल अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. क्यूब कॉल रेकॉर्डर अ‍ॅप सुरु करुन त्याच्या सेटिंग्जमध्ये जावं लागले आणि वॉईस कॉल यामध्ये जाऊन Force Voip वर क्लिक करावं लागले. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉल करायचा आहे. यावेळी तुम्हाला क्यूब कॉल रेकॉर्डर सुरु असलेला दिसेल. याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. पण या सेटिंग्ज करुन सुद्धा तुमचा कॉल रेकॉर्ड होत नसले तर तुमच्या फोनमध्येच ही सेवा उपलब्ध नाही हे समजून घ्या.

आयफोन युझर्ससाठी कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत

तुम्ही आयफोन युझर्स असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला लाईटनिंग केबलने MaC कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या आयफोनवर Trust This Computer असा पर्याय येईल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला Quick Time हा पर्याय सुरु करावा लागेल. त्यामध्ये फाईल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग हा पर्याय निवडावा लागेल.

रेकॉर्ड बटणाच्या खाली दाखवणारा अ‍ॅरो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि आयफोन हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर क्विक टाईममध्ये जाऊन रेकॉर्ड बटणावर क्लिक करा. आणि तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल सुरु करायचा आहे. यानंतर युझर्स आयकॉन अ‍ॅड करायचा आहे. कॉलवरील संभाषण सुरु झाल्यावर रेकॉर्डिंग सुरु होईल. संभाषण झाल्यानंतर रेकॉर्डिंग बंद करायचं आहे आणि रेकॉर्डेड फाईल मॅकमध्ये सेव्ह करायचं आहे.