WhatsApp New Feature | ‘व्हॉट्सअ‍ॅप’नं आणलं नवं फिचर; एकच अकॉउंट 4 डिव्हाइसेसवर ओपन होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  WhatsApp New Feature | जगातील प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अधिक वापरताना दिसतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅप एक लोकप्रिय झालं आहे हे नक्कीच. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Feature) अनेक नवनव्या गोष्टी युजर्सना देत असतं. विविध फिचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप हे सुरक्षित असल्याचा दावा देखील कंपनीकडून स्पष्ट करटण्यात आला होता. तर आता व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एका अपडेटच्या माध्यमातून नॉन बीटा युजर्ससाठी मल्टी-डिवाइस फिचर सादर करणार आहे. या अपडेटद्वारे नॉन बीटा युजर्सही मल्टी-डिवाइसच्या बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊ शकतात, अशी माहिती WABetainfo कडून देण्यात आली आहे.

WhatsApp च्या नवीन फिचरचा वापर करून युजर्स मूळ डिवाइस व्यतिरिक्त एका अकॉउंटशी 4 डिवाइस कनेक्ट करू शकतात. मात्र, कनेक्ट केलेले इतर डिवाइस फोन असू शकत नाहीत. लोकप्रिय मेसेंजरच्या 2.21.19.9 अपडेटमधून सर्व युजर्सना मल्टी-डिवाइस फिचर वापरण्याची संधी मिळेल. हा अपडेट अँड्रॉइड तसेच IOS वर देखील उपलब्ध होईल. भविष्यात अजून अपडेट मिळवायचे असतील तर युजर्सना मल्टी-डिवाइस व्हर्जनवर (Multi-device version) WhatsApp अपडेट करावा लागेल.

दरम्यान, या फिचरच्या मदतीने फोन सोडून पीसी, मॅक आणि टॅबलेट आपल्या मुख्य WhatsApp अकॉउंटशी कनेक्ट करू शकतील. असे केल्यांनतर मूळ डिवाइसमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले अथवा फोन बंद असला तरी कनेक्टड डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल. दरम्यान, या फिचरबाबत घोषणा कंपनीनकडून जून महिन्यात करण्यात आली होती.

WhatsApp वर Multi-device फिचर वापरण्यासाठी…

WhatsApp ओपन करा.

उजवीकडे वरच्या कोपऱ्यात 3 डॉट्सवर क्लिक करा.

Linked Devices वर टॅप करा.

त्यानंतर Multi-Device Beta वर क्लीक करा.

इथे Join Beta वर क्लीक केल्यावर तुम्ही दुसरा डिवाइस कनेक्ट करण्यास सज्ज व्हाल.

 

Web Title : WhatsApp New Feature | whatsapp multi device support now made available non beta users heres how enable feature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | प्रेमसंबंधांमधून जन्मलेल्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या ! मुंढवा पोलिसांचं साडेतीन तास सर्च ऑपरेशन, महत्वाचे पुरावे हस्तगत

Pensioner ला Life Certificate देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, ‘या’ केंद्रांवर करू शकतात जमा

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी