WhatsApp चे ‘हे’ २ नवीन फिचर, युजर्सची मोठी समस्या सुटणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चॅटिंगसाठीचे प्रसिद्ध अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्या ग्राहकांसाठी नवे फिचर्स आणले आहेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या आधी या फिचरसंबंधीत एक रिपोर्ट आला होता की, तुम्ही ज्यांना फोटो सेन्ट करत आहेत ते पुन्हा एकदा पडताळून पाहता येईल की तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्याच व्यक्तीला फोटो पाठवत आहेत का?
हे असेल नवे फिचर –
आता अशाच फिचरवर काम सुरु आहे, या फिचर अंतर्गत व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते म्यूटेड स्टेटस अपडेट ला स्टेटस बार मध्ये पाहू शकणार नाहीत. hide muted status फिचर पुर्ण पणे म्युट केलेल्या स्टेटसला हाइड करता येईल. या फिचर वरुन वापरकर्त्यांना बराच फायदा होईल. कारण जर तुम्ही आता कोणाचे स्टेटस म्यूट करत असाल तरी, स्टेटस टॅब खाली म्युट केलेले स्टेटस देखील पाहू शकतात.

हाइड करा स्टेट्स –
या फिचरची चांगली बाब म्हणजे वापरकर्ता फक्त एका टॅपमध्ये हिडन स्टेटस एक्सेस करु शकतील. येथे तुम्हाला हे करायचे आहे की hide बटणाला सिलेक्ट करावे लागेल जे स्टेटस फिचरमध्ये देण्यात आले आहे. येथे टॅप करताच तुमच्या समोर हाइड केलेली लिस्ट समोर येईल. सध्या या फिचरवर काम सुरु आहे आणि ते वापरकर्त्यांना कधी उपलब्ध करुन देणार याबद्दल सांगण्यात आलेले नाही.

व्हाट्सअ‍ॅप वरुन शेअर करा फेसबूकवर स्टेट्स –
याशिवाय कंपनी एक नव्या फिचरवर काम करत आहे, ज्यात whatapp वापरकर्ता whatapp स्टेटसला फेसबूकवर शेअर करु शकतील. कंपनी मेसेंजर, व्हाट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम याचा मिळून एक प्लॅट फार्म बनवण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेंजर आणि मेसेंजरवरुन व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज सेन्ट करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त – 

गोड’ चॉकलेटचे अतिसेवन शरीराच्या आरोग्यासाठी ‘कडू’

जाणून घ्या – फिटनेसक्वीन ‘जॅकलीन फर्नांडिस’ची दिनचर्या

भारतातील ब्रँडेड मीठात आढळले सायनाइडसारखे घातक घटक

वजन कमी करण्यासाठी वेगन डाएटला अनेकांची पसंती

You might also like