Whatsapp New Features | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय एक जबरदस्त फिचर ! लास्ट सीन केवळ त्यांनाच दिसेल ज्यांना तुम्हाला दाखवायचे आहे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था व्हॉट्सअ‍ॅप मागील एक वर्षापासून दरमहिन्याला दोन-तीन नवीन फिचर जारी करत आहे. अलिकडेच WhatsApp ने वेब व्हर्जनवर मल्टीडिव्हाईस सपोर्ट (Whatsapp New Features) जारी केला आहे, ज्यानंतर यूजर्स एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाचवेळी अ‍ॅक्सेस (Whatsapp New Features) करू शकतात.

 

सर्वात महत्वाची बाब ही आहे की, या नवीन अपडेटनंतर वेब व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी फोन इंटरनेटसोबत कनेक्ट राहणे आवश्यक नाही.
व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवीन फिचर आणण्याची तयारी करत आहे.

 

WhatsApp beta मध्ये एक नवीन अपडेट आले आहे जे यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी आहे. या नवीन अपडेटनंतर यूजर्स आपले लास्ट सीन लपवू शकतात.
सर्वात विशेष गोष्ट ही आहे की, लास्ट सीनवर सुद्धा कंट्रोल होईल म्हणजे तुमचा लास्ट सीन केवळ तेच लोक पाहतील ज्यांना तुम्हाला दाखवायचे आहे.
(Whatsapp New Features) व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर ट्रॅक करणारी WABetaInfo ने या नवीन फिचरची माहिती दिली आहे.
या साईटने एक नवीन फिचरचा स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केला आहे.
मात्र ही वेळ नाही जेव्हा या फीचरबाबत वृत्त आले आहे. यापूर्वी सुद्धा या फिचरबाबत रिपोर्ट समोर आला होता.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नवीन अपडेटनंतर लास्ट सीन डिसेबल करण्याची सुविधा मिळेल. 2017 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने प्रायव्हसी पाहता My Contacts Except
फिचर सादर केले होते आणि आता कंपनी हेच फिचर एक पाऊल पुढे घेऊन जात आहे.
नवीन फिचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि सर्वांसाठी लाँच होण्यासाठी कोणतीही तारीख ठरलेली नाही. (Whatsapp New Features)

 

Web Title : Whatsapp New Features | whatsapp upcoming update gives you more control over your privacy you can decide who can see your last seen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shilpa Shetty – Raj Kundra | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Pune Crime | कार्ला परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर लोणावळा पोलिसांची धाड ! 8 महिलांसह 17 जणांवर FIR, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त

Rachita Ram | कन्नड अभिनेत्री रचिता रामने ‘मधुचंद्रा’च्या रात्री बाबत केलं अत्यंत वादग्रस्त विधान, होतोय जोरदार विरोध